महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT 2 finale week: विजेता होणार असल्याचा अभिषेक मल्हानचा दावा, एल्विश यादवचे योगदान नसल्याचा केला दावा - अभिषेक मल्हान बिग बॉस OTT 2

अभिषेक मल्हान बिग बॉस OTT 2 च्या घरातील सर्वात आघाडीचा स्पर्धक म्हणून ओळखला जातो. त्याने विजेता बनणार असल्याचे स्वतःच भाकित केले असून एल्विस यादव स्पर्धेत टिकणार नसल्याचाही दावा त्याने केला आहे.

Bigg Boss OTT 2 finale week
विजेता होणार असल्याचा अभिषेक मल्हानचा दावा

By

Published : Aug 8, 2023, 3:57 PM IST

मुंबई - सलमान खान होस्ट करत असलेला बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन अखेरच्या आठवड्यापर्यंत पोहोचला आहे. शो संपण्याची वेळ जवळ येत असताना स्पर्धकांमधदील चढाओढ शिगेला पोहोचली असून ट्रॉफीवर नाव कोरले जाण्यासाठी ते कोणतीही कसर सोडताना दिसत नाहीत. कार्यक्रमाच्या आगमी एपिसोडमध्ये अभिषेक मल्हान स्वतःला विजेता व प्रबळ स्पर्धक एल्विस यादव स्पर्धेत टिकणार नाही असे जाहीर करताना दिसणार आहे.

शोच्या निर्मात्यांना नव्या एपिसोडची एक झलक शेअर केली आहे, यात अभिषेक आणि सहकारी स्पर्धक मनीष राणी एल्विसवर चर्चा करताना दिसतील. यापूर्वी एल्विस आणि अभिषेक यांच्या खूप चांगले संबंध होते मात्र आता त्याच्यातील वाद उघड होत आहेत. एल्विसचे शोमध्ये काहीच योगदान नाही असेही अभिषेक म्हणताना दिसतो. या सिझनमध्ये आपला प्रवास सर्वात रोमांचक असल्याचा दावाही अभिषेक करत आहे.

अभिषेक आणि एल्विस यांच्या शिवाय बिग बॉस ओटीटीच्या अखेरच्या आठवड्यात पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबीका धुर्वे आणि जिया शंकर यांनी आपले स्थान टिकवले आहे. गेल्या आठवड्यात दोन स्पर्धक बाहेर पडल्यानंतर निर्मात्यांनी सोशल मीडिया स्टार उर्फी जावेदला निवडले. उर्फीचा शोमध्ये पाहुणी म्हणून एन्ट्री झाली आहे.

अभिषेक मल्हान आणि एल्विस यादव यांच्यात विजेतेपदासाठी तगडी फाईट असली तरी उर्वरीत पूजा भट्ट, मनीषा राणी, बेबीका धुर्वे आणि जिया शंकर यांनीही आपली बाजू लावून धरली आहे. सर्वच जण सतत चर्चेत राहण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे शोमधील रंजकता वाढली आहे. येणारा प्रत्येक दिवस सर्वांसाठी झोप उडवणारा असणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण विजेता होण्याचे स्वप्न पाहात आहेत. अजून काही तरी भव्य दिव्य करुन प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा आणि लोकप्रियता मिळवण्याच्या मागे स्पर्धक आहेत. आगामी काही दिवसात त्यांच्या स्वप्नांचा निकाल ठरणार असल्याचे एका बाजूला चिंता आणि दुसऱ्या बाजूला इर्षा सर्वांनीच कायम जपली आहे. आता सर्वांनाच विजेता कोण ठरतंय याची आतुरता लागून राहिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details