महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Bigg Boss OTT 2 day 55 highlights: अभिषेक आणि एल्विशमधील वैर वाढले, 'वाइल्डकार्ड' कमेंटवरुन काढली एकमेकांची उणीदुणी - एल्विश यादव विरुद्ध अभिषेक मल्हान

सलमान खान होस्ट करत असलेला 'बिग बॉस ओटीटी २' हा रिअ‍ॅलिटी शोचा ग्रँड फिनाले आता फक्त दोन दिवसांवर आहे. शेवटच्या आठवड्यात, अभिषेक मल्हान आणि एल्विश यादव यांच्यातील गैरसमज आणखीन वाढले आहेत. पूजा भट्टने केलेल्या विधानावरुन दोघे एकमेकांची उणीदुणी काढताना दिसले.

Bigg Boss OTT 2 day 55 highlights
अभिषेक आणि एल्विशमधील वैर वाढले

By

Published : Aug 11, 2023, 7:11 PM IST

मुंबई - सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस ओटीटीच्या शेवटच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. या पर्वाचा ग्रँड फिनाले भव्य असण्याची अपेक्षा प्रेक्षकांना वाटते. यामध्ये सस्पेन्स, नाट् आणि रोमांच असेल अशीही आशा आहे. गुरुवारी या स्पर्धेचा ५५ वा एपिसोड पार पडला. यामध्ये एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांच्यातील घट्ट नाते एका क्षुल्लक कारणाने बिघडले. पूजा भट्टनेही तिच्या ‘छोटे लोग’ या कमेंटबाबत तिची भूमिका स्पष्ट केली.

'बिग बॉस ओटीटी २' चा ग्रँड फिनाले जवळ आल्यानंतर एल्विश यादव आणि अभिषेक मल्हान यांच्यातील वैर आणखी वाढले आहे. अभिषेकने पूजा भट्टला केलेल्या 'वाइल्डकार्ड' कमेंटबद्दल एल्विशने नाराजी व्यक्त केली. त्याने पूजाला सांगितले की जेव्हा अभिषेकने तिला 'वाइल्डकार्ड' म्हटले तेव्हा त्याला खूप वाईट वाटले होते. अभिषेक म्हणाला होता की तो कधीही 'वाइल्डकार्ड'ला विजेता मानणार नाही, अशी कमेंट तिच्याबाबत केली होती.

अभिषेक मल्हानने मागील एपिसोडमध्ये पूजा भट्टने वापरलेला 'छोटे लॉग' हा शब्द कसा आवडला नाही याबद्दल मत व्यक्त केले होते. सुरुवातीला त्याला वाटले की, पूजा त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा संदर्भ देत आहे आणि म्हणूनच तिने आपले मत जाहीरपणे सांगितले. पूजाने स्पष्ट केले की तिच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला गेला होता आणि तिच्या म्हणण्यााच अर्थ 'छोटी सोच' म्हणजे 'संकुचित विचार' असा होता. ती म्हणाली की एक काळ असा होता की माझ्या बँक खात्यात फक्त ४ हजार रुपये होते.

बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले जवळ आल्याने घरात अधिक पाहुणे आहेत. लवकरच सुरू होणार्‍या गोंधळातून विश्रांती घेण्यासाठी, ट्रॅव्हल व्लॉगर्स मोहित मिनोचा आणि अनुनय सूद यांनी सहभागींची भेट घेतली व त्यांच्याबरोबर मजा मस्ती केली.

सर्वात अलीकडील एका एपिसोडमध्ये, घरातील स्पर्धकांना बागेच्या परिसरात बोलावण्यात आले जेथे एक मोठे कॅलेंडर लावण्यात आले होते. १७ जूनपासून हा कार्यक्रम ५५ व्या भागापर्यंत प्रदर्शित झाला तेव्हाच्या प्रत्येक घरातील सहकाऱ्याच्या आठवणी दाखवण्यात आल्या. कॅलेंडरची पाने उलटताना एक ट्विस्ट घडला. बिग बॉसने जाहीर केले की बाहेर काढलेल्या स्पर्धकाचे फोटो कॅलेंडरच्या मागील पानावर दिसेल. अभिषेकने कॅलेंडरचे शेवटचे पान फिरवण्याची ऑफर दिली आणि सर्वांना आश्चर्य वाटले, कमी मतांमुळे जिया शंकरला 'बिग बॉस ओटीटी २' या शोमधून बाहेर काढण्यात आले.

'बिग बॉस ओटीटी २' चा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर आहे, आणि घरातील सदस्यांना चकित करून आठवड्याच्या मध्यातच बाहेर काढण्यात आले. जियाला काढून टाकण्यात आले कारण मनीषा आणि एल्विश याला तिच्यापेक्षा जास्त मते मिळाली होती आणि त्यामुळे त्यांची गच्छंती थांबली. जियाने घरातील सदस्यांचा निरोप घेताना या सिझनचे टॉप पाच स्पर्धक कोण आहेत याचा खुलासा केला. 'बिग बॉस ओटीटी २' च्या घरात अंतिम पाच स्पर्धक सध्या पूजा, एल्विश, मनीषा, अभिषेक आणि बेबीका आहेत.

हेही वाचा -

१.Chandramukhi Song Swagatanjali : कंगना रणौत स्टारर 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'स्वागतांजली' गाणे रिलीज

२.Zinda Banda making: पाहा, 'जवान'ची 'लाइफटाईम मोमेंट' : अ‍ॅटली कुमारने शाहरुख खानला दिले आलिंगन

३.Adipurush releases on OTT: 'आदिपुरुष' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर, हिंदी आवृत्ती कुठे झळकणार हे जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details