मुंबई- Weekend Ka Vaar: 'बिग बॉस 17' च्या घरात रोज नवनवे धमाके होताना पाहायला मिळताहेत. आगामी 'वीकेंड का वार एपिसोड'मध्ये अशीच आतषबाजी पाहायला मिळणार आहे. सलमान खान यावेळी कठोर भूमिका घेताना दिसणार आहे. त्यानं मन्नारा चोप्राच्या दुखऱ्या नसवर अभिषेक कुमारनं बोट ठेवल्याचं लक्षात येताच सलमान खाननं त्याची शाळा घेतली. सलमाननं विकी जैनकडेही आपला मोर्चा वळवला, ज्यामुळे अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका प्रमोशनल क्लिपमध्ये सलमान 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता आणि विकीच्या नात्याची चर्चा करताना दिसतो. तो निरीक्षण नोंदवतो की, टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारण्याचा तिचा इतिहास असूनही ती बिग बॉसच्या घरात तिचे व्यक्तिमत्व गमावत आहे. सलमानने खुलासा केला की, विकीने खानजादीला पत्नी अंकिताशी भांडण करण्यासाठी उचकवलं होतं आणि हे ऐकून अंकिता अवाक झाली. विकीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हा एक विनोद होता, परंतु सलमाननं त्याच्या स्पष्टीकरणात व्यत्यय आणला. हा प्रकार अंकितासाठी धक्कादायक होता.
अलीकडील 'बिग बॉस 17' च्या लेटेस्ट प्रोमोमध्ये अभिषेक कुमार आणि इतर स्पर्धकांना लिव्हिंग रूममध्ये दाखवलं आहे. अभिषेकनं विचारलं की, मन्नाराने कधी झाडू उचललाय आहे का आणि ती 'डुप्लिकेट' असल्याचंही तो म्हणाला. यामुळे मन्नाराच्या रागाचा पारा चढतो. यामध्ये तो तिच्या कुंटुंबाला गुंतवत असल्याचं म्हणत ती निषेध व्यक्त करते. यानंतर अभिषेक बोट दाखवून ओरडतो आणि मन्नारा रागाच्या भरात त्याच्याकडे उशी फेकते तेव्हा परिस्थिती आणखीनच चिघळते.
सलमान खानने होस्ट केलेल्या 'बिग बॉस'च्या या सीझनमध्ये घर तीन विभागांमध्ये विभागलं गेलंय. दिल दिमाग आणि दम या तीन विभागात ईशा मालवीय, मन्नारा चोप्रा, अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, UK07 रायडर, अरुण मशेट्टी, नवीद सोले, जिग्ना व्होरा, सोनिया बन्सल, सना रईस खान, मुनावर फारुकी, अभिषेक कुमार तहलका प्रँक, रिंकू धवन, आणि फिरोजा खान यांच्यासह सर्वांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आलंय.