महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अभिषेक कुमारला पाठिंबा दिल्यानं सुमर्थ जुरेलने उडवली ईशा मालवीयाची खिल्ली - इशा आणि समर्थ जुरेल

Sumarth Jurel slams Isha Malviya : बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये समर्थ आणि अभिषेक यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. अभिषेकने समर्थला थप्पड मारल्यानंतर वातावरण तापले. यावेळी अभिषेक कुमारला पाठिंबा दिल्यामुळे सुमर्थ जुरेलने ईशा मालवीयाची खिल्ली उडवली आहे.

Sumarth Jurel slams Isha Malviya
बिग बॉस 17 लेटेस्ट न्यूज

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 8:03 PM IST

मुंबई - Sumarth Jurel slams Isha Malviya : बिग बॉस हा वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो आपल्या प्रेक्षकांना दररोज नव्या नाटकासह त्यातील रंजक वळणाची अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्नसह खुर्चीला खिळवून ठेवत असतो. हा आठवडा बिग बॉसच्या घरात घोटाळ्याच्या घटना आणि नाटकांनी भरलेला आहे. समर्थ जुरेल, ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातील भांडण हे कर्णधारपदाच्या कार्यासह एक प्रमुख आकर्षण ठरलं होतं. निर्मात्यांनी दोन नवीन प्रोमो शेअर केले आहेत. यातून आपल्याला आज रात्रीच्या एपिसोडमध्ये ज्या काही रंजक गोष्टी घडणार आहे त्याची झलक पाहायला मिळते.

लेटेस्ट प्रोमोमध्ये ईशाला समजले आहे की समर्थ तिच्या माजी प्रियकर अभिषेकला खूप त्रास देत आहे. निराश झालेल्या अभिषेकला पाहून इशा मालवीय समर्थ जुरेलला पोकिंगचा किंग म्हणून चिडवते. त्यामुळे समर्थ भडकला आणि त्यानं ईशाशी याविषयी जोरदार वाद घातला.

"जेव्हा लोकांना धक्काबुक्की करण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही किती सक्षम आहात हे सर्वांच्याच लक्षात येतं," पुढे समर्थला हाक मारताना ईशा म्हणते, " धक्के मारण्याच्या बाबतीत तुमच्याशी स्पर्धा नाही, कारण तुम्ही तर त्याचे किंग आहात. अभिषेक तुझ्या गुंडगिरीमुळे सारखा रडत होता.," असे ईशा म्हणाली.

ईशाला उत्तर देताना, समर्थ म्हणतो: "हे तुझे वास्तव आणि तुझे प्रेम आहे. तू अभिषेकला पाठिंबा द्यायचं ठरवलंयस. माझी गर्लफ्रेंड मला साथ देत नाही हे दुर्दैवी आहे. मेरी नहीं तो किसीकी नहीं हो सकती." त्यांच्यातील भांडण वाढत असताना, घरातील सदस्य हस्तक्षेप करतात परंतु दोघांना शांत करण्यात ते अपयशी ठरतात. रूममेट्सही दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतात पण अयशस्वी होतात.

दुसर्‍या प्रोमो व्हिडिओमध्ये, अंकिता लोखंडे आणि विकी जैन कर्णधारपदावरून भांडताना दिसतात. अंकिता विकीच्या जवळ आली आणि तिने त्याला बागेची जबाबदारी सोपवल्यानंतर हा वाद सुरू झाला. विकी अनादराने अंकिताला उत्तर देतो, ज्यामुळे ती चिडते. तिने कर्णधार असल्याचा उल्लेख करत शोमध्ये मिळवलेल्या पदाचा आदर करण्याची मागणी केली. विकीचे म्हणणे आहे की पदाचा नाही तर तिच्या वागण्यामुळे तिचा आदर होईल. पती-पत्नीमध्ये भांडण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तथापि, आगामी एपिसोडमध्ये अंकिता आणि विकी त्यांच्यातील हा वाद कसा मिटतो हे पाहणे मनोरंजक असेल.

हेही वाचा -

1. "मला आई व्हायचंय", दीपिका पदुकोणनं व्यक्त केल्या भावना

2.वरुण धवनच्या 'दुल्हनिया 3'मध्ये जान्हवी कपूरनं घेतली आलिया भट्टची जागा

3.रणबीर कपूर आणि रोहित शेट्टी एकत्र, व्हायरल फोटोनंतर चर्चेला उधाण

ABOUT THE AUTHOR

...view details