महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मुनावर फारुकीने मन्नारा चोप्राची मागितली माफी, विकी आणि अंकिताचं पुन्हा बिनसलं - बिग बॉसच्या घरात फेरबदल

Bigg Boss 17 day 53 highlights: 'बिग बॉस'च्या घरांतील तीन सदनात राहणाऱ्या सदस्यांमध्ये फेरबदल झाल्यामुळे बुधवारच्या एपिसोडमध्ये बरीच नाटकं आणि वादविवाद झाले. घरातील फेरबदलानंतर, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात 'बिग बॉस'च्या ऑफरवर मतभेद झाले, तर मुनावर फारुकी आणि मन्नारा चोप्रा यांच्यात पुन्हा 'मांडवली' झाली आहे.

Bigg Boss 17 day 53 highlights
मुनावर फारुकीने मन्नारा चोप्राची मागितली माफी

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 7, 2023, 12:16 PM IST

मुंबई - Bigg Boss 17 day 53 highlights: प्रेक्षकांचं आरर्षित करण्यासाठीच्या करमाती 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांकडून सुरू असतात. याला 53 वा दिवसही अपवाद नव्हता. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या अनोख्या ऑफरनंतर बुधवारी दिल, दिमाग आणि दम घरामधील घरातील सदस्यांची फेरबदल करण्यात आली. दोघांनी 'दिल' हाऊसमध्ये राहण्यासाठी संपूर्ण सीझनसाठी एकमेकांना नॉमिनेट करण्याच्या ऑफर नाकारल्या असल्या तरी, अनुराग डोभालला नॉमिनेट करण्याची विकीची सूचना अंकिताला योग्य वाटली नाही. परिणामी दोघांमध्ये भांडण झाले. दरम्यान, मुनावर फारुकीने मन्नारा चोप्रा हिच्याशी चर्चा केली आणि त्यांच्यातील वाद सोडवला.

मुनावर फारुकी- मन्नारा चोप्रा पुन्हा एकत्र

विवाहित जोडपे विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यात आणखी एकदा भांडण झालं. तर मुनावर फारुकी आणि मन्नारा चोप्रा यांनी त्यांच्यातले मतभेद दूर केले आहे. एपिसोडमध्ये सहज गप्पा मारताना मुनावर फारुकी आणि मन्नारा चोप्रा यांनी कालच्या वादावर चर्चा केली. मुनावरने तिला 'बदतमीज' म्हटलं होतं, याबद्दल त्यानं माफी मागितली. मन्नारानंही त्याला माफ केलं आणि पुढील गेम प्लॅनवर चर्चा दोघांची रणनिती ठरवली.

सना रईस खानवर विकी जैन भडकला

'बिग बॉस'च्या घरात एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनलेले विकी जैन आणि सना रईस खान घरातील कामांवरून भांडताना दिसले. 'बिग बॉस'नं खुलासा केला की सना विक्की जैनची फॉलोअर असल्याचे दिसत आहे, तेव्हापासून ते दोघे बोलत नव्हते. सनाने तिचे घरकाम टाळण्याच्या मोबदल्यात घरातील सदस्यांचे अर्धे रेशन कमी करण्याला संमती दिली होती. तिचा हा निर्णय घरातील कोणालाच आवडला नव्हता. याच गोष्टीवरुन बुधवारच्या भागातही वाद झाला. भांडणाच्या वेळी सना विकीला म्हणाली, ''मी जेव्हा तुमच्यापासून दूर गेले तेव्हापासून जागे झाली आहे.''

कॉमेडियन-रॅपर मुनावर फारुकीने सना रईस खानच्या म्हणण्याला एपिक स्टाईलने प्रत्युत्तर दिलं आणि अंकिताला सांगितलं, "कसले गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे भांडतात." याव्यतिरिक्त मुनावरने अंकिताला सना प्रत्येक वेळी तिच्या पतीचा अपमान करते तेव्हा तिच्याशी तर्क करण्याचा प्रयत्न न करण्याचा आणि तिच्याशी कठोरपणे न बोलण्याचा सल्ला दिला. अंकिताला गोष्टीची जाणीव झाली आणि तिने सनाला त्याच मुद्द्यांवर वारंवार वाद घालण्याचा सल्ला दिला. तिची चूक ओळखण्यात मदत केल्याबद्दल तिने नंतर मुनावरचे आभारही मानले.

'दम - दिल - दिमाग'च्या नव्या घरात स्पर्धकांची फेरबदल

काही दिवस घरे बंद ठेवल्यानंतर स्पर्धकांना नवीन घरे बहाल करण्यात आली. अंकिता लोखंडे, विकी जैन, अनुराग डोभाल, खानजादी, अभिषेक कुमार आणि सना रईस खान यांच्या वाट्याला 'दम' रूम मिळाली आहे. प्रभावशाली 'दिमाग' रूम ऐश्वर्या शर्मा आणि अरुण महाशेट्टी यांच्याकडे गेली आहे, तर 'दिल' रूममध्ये नील भट्ट, मुनावर फारुकी, मन्नारा चोप्रा, ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि रिंकू धवन हे स्पर्धक राहणार आहेत.

अंकिता लोखंडेला नॉमिनेट करण्याची 'बिग बॉस'ची ऑफर विकी जैनने नाकारली

नील भट्टचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या बदल्यात आणि संपूर्ण हंगामासाठी अंकिता लोखंडेला नॉमिनेशन देण्याच्या बदल्यात विकी जैनला दिल रूममध्ये जाण्याची ऑफर देण्यात आली. विकीने अंकिताचं नाव बदलून घरातील दुसर्‍या रहिवाशाचं नाव ठेवण्यास सांगितलं, परंतु 'बिग बॉस'ने ही ऑफर नाकारली. जेव्हा 'बिग बॉस'ने त्याला स्पर्धक निवडण्यास सांगितलं तेव्हा विकीने अनुराग डोभालची निवड केली.

विकी जैन - अंकिता लोखंडे यांच्या पुन्हा वाद

काल रात्रीच्या (डिसेंबर 6, 2023) एपिसोडमध्ये पती आणि पत्नी विकी आणि अंकिता यांच्यात आणखी एक भांडण झाल्याचं दिसलं. विकीचा दृष्टिकोन समजून घेण्याच्या प्रयत्नात, अंकिताने अनुरागचे नाव त्यानं सुचवलं होते की 'बिग बॉस'ने सुचवलं याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या आरोपांमुळे चिडलेल्या विकीने अंकिताशी चर्चा करण्यास नकार दिला. त्यानं पुढे सांगितले की याबद्दल आता आपल्याला काहीही बोलायचं नाही, तर इतर स्पर्धकांनी विकीवर आंधळेपणाने विश्वास ठेवल्याबद्दल अनुरागची खिल्ली उडवली.

हेही वाचा -

1. हिमांशी खुराणा आणि असीम रियाझचं वेगवेगळ्या धर्मामुळे झाले ब्रेकअप

2.'केजीएफ' स्टार यशच्या आगामी चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री

3.बॉबी देओल अभिनीत इराणी 'जमाल कुडू' गाण्याचा ऑडिओ ट्रॅक झाला रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details