मुंबई- Bigg Boss 17 day 45 highlights : बिग बॉसच्या घरात सतत चालणारी नौटंकी, भांडणं, वाढणाऱ्या आणि तुटणाऱ्या मैत्रीचे बंध, प्रत्येक क्षणाला घडणारं अकल्पित नाट्य यामुळे प्रेक्षक अवाक होऊन जातात. स्पर्धकांच्या घरातील 45 वा दिवसही याला अपवाद नव्हता. दिवसाच्या अखेरीस नॉमिनेशनची नाव उघड होत असताना स्पर्धक वाद घालताना दिसले. दिवसाभर वाद घालणाऱ्या अंकिता लोखंडे आणि नील भट्ट यांनी सर्वाधिक प्रसिद्धी मिळवली. तर अभिषेक कुमारचा मन्नारा चोप्रा आणि मुनावर फारुकी यांच्याशी वाद झाला.
अनुराग डोभाल शो सोडण्यासाठी इच्छूक, दंडही भरण्यास तयार
मंगळवारच्या एपिसोडमध्ये अनुराग डोभालने पुन्हा एकदा रिअॅलिटी शोमधून स्वेच्छेने बाहेर पडण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर बिग बॉसनं बागेच्या परिसरात सर्व स्पर्धकांना एकत्र करून त्यांच्याशी संवाद साधला. बिग बॉसनं सांगितलं की, शोची कायदेशीर टीम त्याच्या वकिलांशी संपर्क साधेल आणि 2-3 दिवसांत प्रतिसाद देईल. त्यानंतर अनुराग डोभालने बिग बॉसला दार उघडण्याची विनंती केली. त्यानं पुन्हा एकदा शो स्वेच्छेने सोडू जात असल्याचं सांगितलं. शो मधूनच सोडत असल्यामुळे त्याने 2 कोटी दंड म्हणून भरण्याची तयारीही दाखवली.
या आठवड्यात नॉमिनेट झालेले स्पर्धक
या आठवड्यात शोमधून बाहेर जाणाऱ्यांच्या यादीत खानजादी नॉमिनेट झाली आहे. तिनं इतरांना नॉमिनेट करण्यापासून वाचवलं आहे. अनुरागने रिंकूला नॉमिनेट केलं, तिनं नॉमिनेशनसाठी विक्कीचं नाव घेतलं. नीलनं नॉमिनेशनसाठी अंकिताची निवड केली, परिणामी जोरदार वाद झाला. अंकिताने मन्नारा आणि नंतर अरुणला नॉमिनेट केले. या साखळीमुळे अरुण अस्वस्थ आहे. नॉमिनेशन कार्याच्या शेवटी, नामांकित स्पर्धकांमध्ये अनुराग डोभाल, रिंकू धवन, विकी जैन, अंकिता लोखंडे, नील भट्ट, मन्नारा चोप्रा, अरुण मशेट्टी यांचा समावेश होता.
नील भट्ट संपूर्ण हंगामासाठी नॉमिनेट