मुंबई- Bigg Boss 17 day 26 highlights: बिग बॉसचा 17 वा सिझन सुरू झाल्यानंतर एपिसोडगणिक शोची लोकप्रियता वाढतेय. सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व मनोरंजक घटकांचा समावेश आहे. अंकिता लोखंडे, विकी जैन, मन्नारा चोप्रा, ऐश्वर्या शर्मा, अभिषेक कुमार, ईशा मालवीय आणि इतर या स्पर्धकांनी घरात घातलेल्या सळ्या गोंधळानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय.
'पॉवर की रेस' टास्क
बिग बॉस 17 मध्ये देण्यात आलेल्या टास्कमुळे घरातील स्पर्धकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असून त्यांच्या नातेसंबंधांवरही परिणाम झालाय. अंकिता लोखंडे, खानजादी आणि सना रईस खान या तीन महिला स्पर्धकांना त्यांच्या सहकारी स्पर्धकांना 'पॉवर की रेस' मधून काढून टाकण्याची संधी देण्यात आलीय. परिणाम म्हणून त्यांच्या विशेष क्षमता काढून टाकण्यात आल्यात.
तिन्ही मुलींनी अनोखे पोशाख परिधान केले आणि घुंगरूचा आवाज ऐकून त्यांना अॅक्टिव्हिटी रूममध्ये जावं लागलं आणि डान्स करावा लागला. त्यानंतर, त्यांना तीन निवडक स्पर्धकांवर गुलाल टाकावा लागला आणि त्यांना सत्तेच्या शर्यतीतून दूर करण्यात आलं. सुरुवातीच्या फेरीत अंकिता लोखंडे पहिल्यांदा जाते आणि नंतर तिचे प्रतिस्पर्धी ऐश्वर्या, नील आणि मुनावर यांना स्पर्धेतून काढून टाकते.
अंकिता लोखंडेमुळे मुनावर फारुकी दुखावला
अंकितानं घेतलेल्या या निर्णयामुळे मुनावर फारुकी नाराज झालेला दिसतो. यासाठी तो आपला विरोध दाखवतो त्यामुळे अंकिता आणि त्याच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळतं. नंतर आपल्या टोमण्यामुळे दुखावल्याचं अंकिता मान्य करते. सनाने दुसऱ्या फेरीत विकी, ईशा आणि अभिषेक यांना स्पर्धक म्हणून निवडून त्यांचे विशेष अधिकार काढून टाकले. त्यानंतरच्या फेरीत, खानजादीने अनुराग, समर्थ आणि सनी यांना सत्तेच्या शर्यतीतून काढून टाकले.
विकी जैन अंकिता लोखंडेच्या निर्णयांमध्ये फेरफार करत असल्याने बिग बॉसची प्रतिक्रिया
पुढच्या फेरीत कोणी जायचे यावरून तीन मुलींमध्ये वाद झाल्याचं पाह्यला मिळतं. बिग बॉसनं यामध्ये हस्तक्षेप करून त्यांना एकत्र परफॉर्म करण्याची सूचना दिली आणि त्यानंतर ज्या स्पर्धकांना शर्यतीतून बाहेर काढू इच्छितात त्यांची नावे सांगायला सांगितलं. यानंतर विकी जैननं अंकिताच्या निर्णयावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिग बॉसनं त्याला या कार्यातून काढून टाकलं.