मुंबई - वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मधील टास्क जिंकल्यानंतर चित्रपट निर्माता साजिद खानला कर्णधाराचा सन्मान देण्यात आला आहे. आता तो आपल्या तंत्राने घर चालवताना पाहायला मिळणार आहे.
कॅप्टन्सी टास्क नवीन एपिसोडमध्ये पार पडला. यात बिग बॉसने जाहीर केले की हे टास्क घरामध्ये फेरफटका मारणार आहे आणि साजिद टूर गाइड असेल. कर्णधारपदासाठी साजिद खान आणि टीना दत्ता उत्सुक होते. अखेर ही कर्णधारपदाची माळ साजिदच्या गळ्यात पडली आहे.