मुंबई- अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ( Tejasswi Prakash ) ही एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. बिग बॉस 15 ची विजेती ठरलेली तेजस्वी ही एक मराठमोळी मुलगी आहे हे अनेकांना माहितच नव्हते. टेलिव्हिजन शोमध्ये तिच्या अभिनयाने लाखो मने जिंकणारी तेजस्वी आता मराठी चित्रपटात झळकणार म्हटल्यानंतर बऱ्याच जाणांच्या भुवया उंचावल्या.
तिचे संपूर्ण नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असे आहे. तिचा जन्म मराठी भाषिक संगीतमय कुटुंबात झाला. ती शिक्षणाने इंजिनियर आहे. तिने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली.तेजस्वी प्रकाशचे इन्स्टाग्राम तिच्या सुंदर फोटोशूट आणि व्हिडिओने सजलेले आहे. ती सौंदर्यवान तर आहेच पण ब्यूटी विथ ब्रेन आहे. तिच्याकडे अनेक प्रतिक्षा भरलेल्या आहेत. नागिन या मालिकेतून आपण तिला अभिनय करताना पाहिले असेलच पण ती उत्तम गायिकाही आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केलाय यात ती गाताना दिसते.
तेजस्वी प्रकाशने गायलेले गाणेही खूप सुंदर आहे. लता मंगेशकर यांनी गायलेले ना जिया लागे ना हे गाणे तिने निवडण्याचे धाडस केले व उत्तम रितीने ते निभावल्याचेही दिसत आहे. राजेश खन्ना अमिताभ बच्चन, सुमिता सन्याल, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या आनंद चित्रपटातील ना जिया लागे ना हे गाणे तेजस्वीने उत्तम गायले आहे.