मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने बिग बॉस 16 च्या वीकेंड का वार भागात सुंबुल तौकीरला चांगलेच झापले आहे. ती स्वतःतच रमलेली दिसत असून शोमध्ये तिचा वावरच दिसत नसल्याचे सलमान म्हणाला. या एपिसोडमध्ये फोन भूत स्टार्स कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत.
सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका प्रोमो व्हिडिओमध्ये, मागील आठवड्यात तिचा खेळ पाहून सलमान सुंबुलवर रागावल्याचे दिसते.तो तिला सोफ्याच्या मागे उभं राहण्यास सांगतो आणि नंतर बेडरूमच्या भागात जाण्यास सांगतो.
"आज की तारीख में आप मिसाल बनी हुई हो. फॉर समबडी जो पिछे पढी रहती, हाय टॅग अलॉंग करती है, रोते रहती है'', असे सलमान तिला म्हणाला.