मुंबई- चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शक फराह खानने बिग बॉस 16 च्या घरात तिचा भाऊ साजिद खानची भेट घेतली. ९ जानेवारीला फराहचा वाढदिवस असतो तो तिने भावाच्या भेटीत साजरा केला. 'फॅमिली वीक' दरम्यान, स्पर्धकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटता येते.
खूप भांडणानंतर, बिग बॉस 16 च्या घरामध्ये थोड्या काळासाठी स्पर्धकांच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रवेशामुळे सर्वचजण भावनिक क्षणांचे साक्षीदार झाले. फराहनेही तिचा भाऊ साजिदला भेटण्यासाठी घरात प्रवेश केला. साजिद खान 16वा सीझन सुरू झाल्यापासून घरात बंद आहे.
रविवारी संध्याकाळी कलर्स टीव्हीनेे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फराह साजिदला घट्ट मिठी मारताना दिसत आहे. त्याला भेटतानाही ती रडली. फराहने साजिदला तिच्या शुभेच्छा दिल्या आणि म्हणाली, 'मम्मीला तुझा खूप अभिमान आहे.' ती स्पर्धकांसाठी भरपूर खाद्यपदार्थ घेऊन घरात गेली, ज्यात व्हेज पुलाव, खट्टा आलू, याखनी पुलाव आणि अब्दु रोजिकसाठी एक बर्गर होता.
फराहने घरातील प्रत्येक सदस्याचे कौतुक केले आणि सांगितले की प्रियांका चहर चौधरी ही बिग बॉस 16 च्या घरातील दीपिका पदुकोण आहे. तिने सुंबुलला असेही सांगितले की साजिद जसा तिला चिडवतो, तसाच तो त्याच्या बहिणींसोबतही करतो आणि तो तिला आपली बहीण मानतो.
तिने सांगितले की आता तिला आणखी तीन भाऊ आहेत आणि ते शिव ठाकरे, अब्दू रोजिक आणि एमसी स्टेन आहेत. फराहने स्पर्धकांना शो संपल्यानंतर पार्टी देण्याचे आश्वासनही दिले. यावेळी फराहने सौंदर्याला गौतम सिंग विगसोबतच्या तिच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला.
फराह खान ही ओम शांती ओम, हॅपी न्यू इयर यासह अनेक चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी ओळखली जाते. कोरिओग्राफर म्हणून तिने जो जीता वही सिकंदर, कभी हा कभी ना, दिलावाले दुल्हनिया ले जायेंगे, हाऊसफुल 4 आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
सलमान खानने होस्ट केलेला बिग बॉस 16 या शोचा 1 ऑक्टोबर 2022 रोजी प्रीमियर झाला. रिअॅलिटी शोचा ग्रँड फिनाले मुदतवाढ मिळाल्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे.