मुंबई - दिवंगत डिस्को किंग बप्पी लाहिरी यांचे एक गाणे 'जिम्मी जिम्मी आजा' आता एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे. जिम्मी जिम्मी आजा याचा चीन भाषेत अर्थ होतो "मला भात दे, मला तांदूळ दे." सध्या चीनमध्ये कोविडचा पुन्हा कहर सुरू झाला आहे आणि यासाठी आंदोलनाचे प्रतिक बनले आहे हेच "मला भात दे, मला तांदूळ दे..." हे गाणे. या गाण्याचा एक चायनीज व्हिडिओ जगभर पसरला असून चीनच्या कोविडग्रस्त नागरिकांचा आवाज हे गाणे बनले आहे.
बप्पीदा यांनी संगीतबद्ध केलेले आणि पार्वती खानने गायलेले 'जिम्मी जिम्मी आजा आजा' हे गाणे 1982 मध्ये आलेल्या 'डिस्को डान्सर' या हिट चित्रपटाच्या रिलीजनंतर हिट झाले. आता ते गाणे 'जे मी जी मी...' असे बदलले आहे. चायनीजमधून भाषांतरित, या गाण्याचा अर्थ आहे "मला भात दे, मला तांदूळ दे..." चिनी लोक त्यांच्या या गाण्याच्या व्हिडिओमध्ये रिकाम्या डिशेस दाखवत आहेत. चीन सरकारच्या कडक सुरक्षेचे कुंपण ओलांडून हा व्हिडिओ कसा तरी समोर आला आहे. चीनमध्ये इंटरनेटवरील असा कोणताही व्हिडिओ काही वेळात सेन्सॉर केला जातो. पोस्ट हटवली पण कसा तरी हा व्हिडीओ यंत्रणेचे डोळे टाळून सर्वांसमोर आला आहे.