मुंबई -कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेने नुकताच १००० भागांचा टप्पा पार केला. मालिकेच्या समपूर्ण टीमने तो क्षण वेगळ्या पद्धतीने साजरा केला. मालिकेच्या सेटवर खास पाहुणे आले होते ते म्हणजे ‘We Will We Can’ फाउंडेशन या एनजीओ ची ७० मुलं. या मुलांसोबत मालिकेच्या टीमने संवाद साधला. आपल्या आवडत्या कलाकाराला समोर बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'च्या १००० भागांचं सेलिब्रेशन कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केले आणि त्यामुळेच मालिकेने तब्बल १००० भागांचा पल्ला यशस्वीरित्या गाठला आहे आणि पुढचा प्रवास सुरूच आहे. याचनिमित्ताने मालिकेच्या सेटवर थोड्या अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन करण्यात आले. कांदिवली येथील ‘We Will We Can’ फाउंडेशन या एनजीओच्या ७० मुलांनी सेटला भेट दिली.
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'च्या १००० भागांचं सेलिब्रेशन त्यांनी टाळ्यांच्या कडकडाट सुमित पुसावळे (बाळूमामा) आणि संतोष अयाचित यांचे स्वागत केले. पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर राहणं सोपं नाही. यामागे संपूर्ण टीम म्हणजेच मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ, मंडळी यांचा मोलाचा वाटा आहे. या खास प्रसंगी भेटीस आलेल्या मुलांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारले तसेच सुमितने देखील त्याचा अविस्मरणीय क्षण सांगितला. सुंदरा म्हणजेच बाळूमामांची आई आणि बाळूमामा यांची मालिकेतील शेवटची भेट ज्यामध्ये बाळूमामा सांगतात आता आपली भेट वैकुंठात तो सीन कधीच विसरणार नाही असे त्याने सांगितले. असे अजून काही किस्से सांगत ही गप्पांची मैफल रंगत गेली. जेव्हा बाळूमामा या व्यक्तिरेखेसाठी निवडला गेलो हे मला कळाले तेव्हा आईला ही गोड बातमी सांगताना मला अश्रू अनवार झाले होते असेदेखील त्याने यावेळेस सांगितले. एका चिमुकलेने सुमितला पुष्पगुच्छ देऊन बाळुमामाच्या नावानं चांगभलं असे म्हटले तेव्हा सगळ्यांनाच कौतुक वाटले.