मेरठ: ‘बिग बॉस 16’च्या घरामध्ये शिव ठाकरे आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये तुफान राडा झाला. साजिद खान (Sajid Khan) आणि गौरी नागोरीचे (Gauri Nagori) भांडण सुरु असताना शिवने या वादात उडी घेतली. हे भांडण सुरु असताना शिवनंतर अर्चनानेही साजिद-गौरीच्या भांडणामध्ये भाग घेतला. या वादादरम्यान शिव अर्चनाच्या जवळ आला. यादरम्यान अर्चनाने त्याचा चक्क गळा पकडला. त्यानंतर अर्चनाला अचानक घराबाहेर काढण्यात आले. पण ‘विकेंड का वार’मध्ये (weekend ka war) काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या अर्चना गौतम (Archana Gautam) पुन्हा बिग बॉसमध्ये परतली आहे. यामुळे मेरठसह देशभरातील तिचे चाहते चांगलेच खूश आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. 10 नोव्हेंबर रोजी अर्चना गौतमला घरातून हाकलण्यात आले. पण, तिच्या चाहत्यांच्या मागणीनुसार तिला परत आणण्यात आले आहे.
अर्चना गौतमचे पुनरागमन: मेरठच्या अर्चना गौतमचे शोचे स्पर्धक शिव ठाकरेसोबत (Shiv Thakare) भांडण झाले होते. त्यानंतर तिला बिग बॉसने (Bigg Boss) घरातून बाहेर काढले होते. पण, 12 नोव्हेंबरच्या रात्री अर्चना गौतमने शोमध्ये पुन्हा प्रवेश (Archana Gautam's comeback) केला. अर्चना गौतमच्या पुनरागमनाची माहिती असल्याने तिचे चाहते शनिवारी शोची आतुरतेने वाट पाहत होते. अर्चना गौतमने हस्तिनापूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. अर्चना बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर शहरातील रहिवाशांमध्ये निराशा पसरली होती.