महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'शूरवीर'मध्ये दिसणार भारतीय पडद्यावर कधीही न दिसलेला हवाई लढाऊ सीक्वेन्स - कनिष्क वर्मा दिग्दर्शित शूरवीर

कनिष्क वर्मा दिग्दर्शित ‘शूरवीर'मध्ये जबरदस्त ॲक्शन बघायला मिळणार आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्वात प्रभावी आणि बलवान अधिकारी एकत्र येताना दिसतील. भारतातील सर्वोच्च संरक्षण दलातील सर्वोत्कृष्ट इलिट टास्क फोर्स शूरवीर'मध्ये दिसेल.

शूरवीर
शूरवीर

By

Published : Jun 18, 2022, 1:07 PM IST

हल्ली वेब सिरीज ना खूप मागणी असून ॲक्शन मिश्रित कथांना प्रेक्षक पाठिंबा देताना दिसतात. अशाच पद्धतीची सिरीज घेऊन येत आहे डिज्नी+ हॉटस्टार ज्याचे नाव आहे ‘शूरवीर’. जगरनॉट प्रॉडक्शन निर्मित, समर खान निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित ‘शूरवीर'मध्ये जबरदस्त ॲक्शन बघायला मिळणार आहे. आपल्या देशाच्या संरक्षणासाठी हवाई दल, नौदल आणि लष्करातील सर्वात प्रभावी आणि बलवान अधिकारी एकत्र येताना दिसतील. भारतातील सर्वोच्च संरक्षण दलातील सर्वोत्कृष्ट इलिट टास्क फोर्स शूरवीर'मध्ये दिसेल.

अभिनेता मकरंद देशपांडे, मनीष चौधरी, रेजिना कॅसांड्रा, अरमान रल्हान, आदिल खान, अभिषेक साहा, अंजली बारोट, कुलदीप सरीन, आरिफ झकेरिया, फैसल रशीद, साहिल मेहता आणि शिव्या पठाणी हे दिग्गज कलाकार देशविघातक चोरट्या कारवाया, प्रखर लष्करी प्रशिक्षण, हवाई लढाई आणि बुद्धिमान योजना आदींवरील कथा सादर करण्यासाठी एकत्र आले असून महत्त्वाचे म्हणजे ही कथा आपल्याला या अभिजात सैनिकांमधील मानवी संबंधांची कथा सांगते.

दिग्दर्शक कनिष्क वर्मा म्हणाले, “शूरवीरमध्ये, अष्टपैलू कलाकारांच्या एकत्रित अभिनयाचे सुरेख मिश्रण आहे. या प्रतिभावान कलाकारांना दिग्दर्शित करणे हा एक अद्भुत अनुभव होता. जेव्हा तुम्ही ॲक्शन म्हणता आणि तुमच्या डोळ्यांसमोर जादू घडत जाते. मकरंद देशपांडे आणि मनीष चौधरी यांसारख्या दिग्गजांना त्यांच्या भूमिकेत शिरताना पाहणे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. डिज्नी+ हॉटस्टारसोबत काम करणे, हा देखील एक सुरेख प्रवास होता आणि त्यांनी हे सर्व जुळवून आणण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य दिले. ही एक अनेक अशक्य गोष्टींपैकी एक होती मात्र हे सर्व एकत्र पडद्यावर शक्य झालेले पाहणे हा खरोखरच एक समाधानकारक अनुभव आहे. भारतीय पडद्यावर कधीही न दिसलेले हवाई लढाऊ सीक्वेन्स, हे या शोचे मुख्य आकर्षण ठरेल.”

ख्यातनाम अभिनेते मकरंद देशपांडे म्हणाले, “शूरवीरने लष्कर, नौदल आणि हवाई दलातील उत्तम लोकांना एक टीम म्हणून एकत्र आणले ज्यामुळे मला या कथेत स्वारस्य निर्माण झाले. यातील माझी आणि मनीष चौधरीची व्यक्तिरेखा या टीमला भारतातील सर्वोत्कृष्ट संरक्षण दल बनवणे आणि त्यांना संरक्षणाची पहिली फळी म्हणून अबाधित ठेवणे, हे आहे. मालिकेचे चित्रीकरण करताना सर्व प्रतिभावान कलाकारांकडून शिकण्याचा एक अद्भुत प्रवास होता. डिज्नी+ हॉटस्टारवर ही मालिका प्रदर्शित होत आहे यामुळे मी खरोखरच खूप रोमांचित झालो आहे कारण त्यामुळे आम्हाला जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.”

या काल्पनिक सिरीजमध्ये हाय ऑक्टेन ॲक्शन ड्रामा असून ही मालिका केवळ डिज्नी+ हॉटस्टारवर हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगालीमध्ये लवकरच येत आहे.

हेही वाचा -अक्षय कुमारच्या 'राम सेतू'ची अजय देवगणच्या 'थँक गॉड'शी दिवाळीत होणार टक्कर!!

ABOUT THE AUTHOR

...view details