मुंबई- टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आणखी एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या रायगडमध्ये राहणाऱ्या सोशल मीडिया स्टार लीना नागवंशी हिने आत्महत्या केली आहे. मिलालेल्या बातमीनुसार, लीनाने राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे 24 डिसेंबरला टीव्ही अभिनेत्री तुनिषानेही शूटिंग सेटच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला होता. तुनिषाचे चाहते अजूनही या बातमीने सावरले नव्हते की इतक्यात लीनाच्या बातमीने लोकांना धक्का बसला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला - लीना (२२) ही रायगडमधील केलो बिहार कॉलनी येथील रहिवासी होती. लीनाची माहिती मिळताच चक्रधर परिसरातील पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. सध्या लीनाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. आता लीनाच्या मृत्यूचे कारण पोस्टमॉर्टमनंतरच समोर येईल.
घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली नाही - लीना जिवंत असल्याचा विचार करून तिच्या कुटुंबीयांनी तिला फासावरुन उतरवले होते. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा लीनाने दुपट्ट्याने गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळावरून लीनाचा मोबाईल जप्त केला. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.