महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

The Night Manager Part II trailer : द नाईट मॅनेजर 2 च्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू, वेब सिरीजच्या स्ट्रिमिंग तारखेचीही घोषणा - आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर

द नाईट मॅनेजर भाग २ चा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. या उत्कंठावर्धक थ्रिलर शोमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

The Night Manager Part II trailer
द नाईट मॅनेजर 2 च्या ट्रेलरची प्रतीक्षा सुरू

By

Published : Jun 2, 2023, 7:57 PM IST

मुंबई - आदित्य रॉय कपूर आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या द नाईट मॅनेजरने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. अत्यंत रंजक वळणावर या मिलेचा पहिला भाग संपला होता. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये याच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा सुरू झाली होती. अखेर निर्मात्यांनी मालिकेच्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

इंस्टाग्रामवर अभिनेता अनिलने मालिकेचे एक नवीन मोशन पोस्टर शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिल, राजा आणि चौकिदाराच्या या कहानीचा आता लागणार निकाल. हॉट स्टार स्पेशलवर द नाईट मॅनेजरच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर 5 जून रोजी प्रदर्शित होईल. द नाईट मॅनेजर हा ब्रिटिश टेलिव्हिजन ड्रामा द नाईट मॅनेजरचा हिंदी रिमेक आहे. ख्यातनाम लेखक जॉन ले कॅरे यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित याचे कथानक आहे.

संदीप मोदी यांनी या हिंदी वेब सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. आदित्य रॉय कपबूरने माजी गुप्तचर अधिकारी शान सेनगुप्ता यांची मुख्य भूमिका साकारली आहे आणि अनिल कपूर यांने शैलेंद्र रुंगटा ही खलनायकी व्यक्तीरेखा साकारली आहे. अभिनेत्री शोभिता धुलिपाला, तिलोतमा शोम, सास्वता चॅटर्जी आणि रवी बहल हे देखील वेब शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

द नाईट मॅनेजर: भाग २ डिस्ने+ हॉटस्टारवर ३० जूनपासून प्रवाहित होईल. पहिल्या भागात शेली रुंगटा (अनिल कपूर) आणि शान सेनगुप्ता (आदित्य रॉय कपूर) यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यांच्या भूमिकांचे खूप कौतुकही झाले होते. याबद्दल बोलताना आदित्यम्हणाला होता,

पाहिला ज्यामुळे चाहत्यांनी या दोघांसाठी अधिक विचारणा केली. याआधी त्याच्या भूमिकेसाठी खूप कौतुक झालेल्या आदित्यने सांगितले, 'पहिल्या भागाला मिळालेले यश खरोखरच मोठे होते. शेली आणि शानच्या पुढील प्रवासात काय घडणार आहे हे पाहण्यासाठी आम्ही प्रेक्षकांसोबत उत्सुक आहोत. ट्विस्ट, थरार आणि तणाव - सर्व समाप्त होईल. द नाईट मॅनेजर भाग 2 ची प्रतीक्षा अखेर संपली आहे आणि आम्ही सर्व प्रतिक्रियांची वाट पाहत आहोत'.

हेही वाचा -

१.Boney Shares Unseen Picture : बोनी कपूरने लग्नाच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त शेअर केला श्रीदेवीसोबतचा न पाहिलेला फोटो

२.Mani Ratnam And Ilayaraaja Birthday : दिग्दर्शक मणिरत्नम आणि इलायराजा यांना मुख्यमंत्री स्टॅलिन आणि कमल हासन यांनी दिल्या शुभेच्छा

३.Amber Heard Quitting Hollywood : जॉनी डेपसोबत खटला हरल्याने हॉलिवूड सोडल्याचे वृत्त अंबर हर्डने फेटाळले

ABOUT THE AUTHOR

...view details