मुंबई - नुकतंच प्रेक्षकांना कळलं की डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार आहे. पण त्याच्या जोडीला अजून एक हरहुन्नरी अभिनेत्री परिक्षिकेची भूमिका निभावणार आहे. दुसरी परीक्षक असणार आहे महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी. झी मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स या कार्यक्रमासाठी अप्रतिम डान्सर-अभिनेता गश्मीर महाजनी बरोबर आता अभिनेत्री-नृत्यांगना सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा परिक्षिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला सोनाली कुलकर्णीच उत्तम नृत्यकौशल्य नवीन नाही. सोनाली कुलकर्णी ही परीक्षकाच्या भूमिकेसाठी योग्य आहे यात काही वादच नाही. गश्मीर-सोनाली ही परीक्षकांची जोडी लिटिल मास्टर्सना उत्तम मार्गदर्शन करतील याबद्दल शंकाच नाही. या कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून काही खास लिटिल मास्टर्स शोधून काढतेय.