महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Maharashtra Din : एण्‍ड टीव्‍हीवरील अमराठी व मराठी कलाकारांकडून जय महाराष्ट्र - undefined

महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) एण्‍ड टीव्‍हीवरील काही प्रमुख कलाकारांनी महाराष्‍ट्र दिनाच्‍या हार्दिक शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. मुंबईकर मुंबईच्या विकासातही हातभार लावत आहेत. दरवर्षी राज्‍याचा स्‍थापनादिन म्हणून १ मे रोजी महाराष्‍ट्र दिन साजरा केला जातोच

Maharashtra Din

By

Published : May 1, 2022, 7:39 PM IST

मुंबई : महाराष्ट्र दिनी (Maharashtra Din) एण्‍ड टीव्‍हीवरील काही प्रमुख कलाकारांनी महाराष्‍ट्र दिनाच्‍या हार्दिक शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. मुंबईकर मुंबईच्या विकासातही हातभार लावत आहेत. दरवर्षी राज्‍याचा स्‍थापनादिन म्हणून १ मे रोजी महाराष्‍ट्र दिन साजरा केला जातोच एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार 'एक महानायक - डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मधील अथर्व (तरूण भीमराव) व जगन्‍नाथ निवंगुणे (रामजी सकपाळ), 'बाल शिव'मधील मौली गांगुली (महासती अनुसूया), 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील हिमानी शिवपुरी (कटोरी अम्‍मा) आणि 'भाबीजी घर पर है'मधील रोहिताश्‍व गौड (मनमोहन तिवारी) यांनी महाराष्‍ट्र दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'बाल शिव'मधील मौली गांगुली (महासती अनुसूया) म्‍हणाल्‍या, ''महाराष्ट्रामध्ये वन्यजीव, इतिहास, धर्म आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा विलक्षण वारसा आहे. आणि राज्‍याला ‘योद्धांची भूमी’ म्हटले जाते. मी मुंबईत आले. तेव्हा एका महाराष्‍ट्रीयन कुटुंबासोबत चार वर्षे पेइंग गेस्ट म्हणून राहिले आणि ते आजही माझ्यासाठी एका कुटुंबासारखेच आहेत. मला महाराष्‍ट्रीयन संस्कृती आवडते आणि गेली अनेक वर्षे लेझीम आणि ढोल पथक यांसारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचा मला नेहमीच आनंद होतो. मला सणादरम्यान पुरणपोळी, श्रीखंड पुरी यांसारखे महाराष्‍ट्रीयन पदार्थ खायलाही आवडते. मी महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले आणि वास्तूंना भेट देते तेव्‍हा त्यामागील ऐतिहासिक महत्त्व शोधण्याचा प्रयत्‍न करते. राज्याच्या स्‍थापनेसाठी जनतेने केलेल्या त्याग आणि संघर्षाबद्दल समजल्‍यानंतर माझे हृदय अभिमानाने आणि भावनेने भरून जाते.''

हेही वाचा -Janhvi Kapoor Dance Video : इन आखों की मस्ती में..सादर करत जान्हवीने दिल्या शुभेच्छा

पाहा काय म्हणतात विविध कलाकार
'एक महानायक - डॉ. बी. आर. आम्‍बेडकर' या मालिकेमध्ये तरूण भीमरावांची भूमिका साकारणारा अथर्व म्‍हणाला, ''मी पुण्‍याचा आहे, जे महाराष्‍ट्रातील दुसरे सर्वात मोठे शहर असण्‍यासोबत काही सर्वोत्तम शैक्षणिक संस्‍था, संपन्‍न सांस्‍कृतिक वारसा, फूड अशा गोष्‍टींनी संपन्‍न सर्वोत्तम शहर आहे. दरवर्षी आपण महाराष्‍ट्राच्‍या स्‍थापनेनिमित्त हा दिवस साजरा करतो. महाराष्‍ट्र भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्‍य आहे. आपल्‍या राज्‍याच्‍या स्‍थापना दिनानिमित्त आपण आपला गौरवशाली इतिहास व संस्कृती आणि त्याची गेल्या काही वर्षांमध्ये झालेली अफाट वाढ व विकास यांना उजाळा देऊन अभिमान बाळगू या. महाराष्‍ट्र दिनाच्‍या हार्दिक शुभेच्‍छा.''

मी मराठीच
मालिका 'भाबीजी घर पर है'मधील रोहिताश्‍व गौड (मनमोहन तिवारी) म्‍हणाले, ''महाराष्‍ट्र दिन राज्‍यभरात जल्‍लोषात व उत्‍साहात साजरा केला जातो. महाराष्‍ट्राचा उत्‍साह वैश्‍विक, अग्रणी विचारसरणी, सहिष्‍णू व गतीशील आहे आणि या राज्‍याने मला बरेच काही दिले आहे. या दिनी माझे कुटुंब आणि मी पारंपारिक लावणी संगीत कार्यक्रम, लोकगीते आणि सुप्रसिद्ध मराठी संतांच्‍या कवितांचे पठण अशा विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमांमध्‍ये जातो. कोणत्‍याही कलाकारासाठी महाराष्‍ट्र हे प्रमुख मनोरंजन क्षेत्र आहे आणि या राज्‍याने मला माझ्या अभिनय करिअरदरम्‍यान अनेक संधी दिल्‍या आहेत. हे राज्‍य भारतभरातील लोकांना खुल्‍या मनाने स्‍वीकारते. विशेषत: मुंबई शहर मला खूपच आवडते. माझ्या 'कर्मभूमी'ने मला नवीन ओळख दिली. भारत व महाराष्‍ट्राचा अभिमानी नागरिक म्‍हणून माझ्याकडून सर्वांना महाराष्‍ट्र दिनाच्‍या आनंदमय शुभेच्‍छा.''
हेही वाचा -Prema kiran passed away : ‘धुमधडाका’ 'दे दणादण' चित्रपटाच्या नायिका प्रेमा किरण यांचे निधन

ABOUT THE AUTHOR

...view details