महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सुबोध भावे मराठी नायिकांना सांगतोय 'बस बाई बस'! - सुबोध भावेचा नवीन शो

अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरणार आहे. यावेळेस तो महिला कलाकारांसोबत मजामस्ती करीत एक कार्यक्रम करीत आहे ज्याचे नाव आहे 'बस बाई बस'.

सुबोध भावे
सुबोध भावे

By

Published : Jul 21, 2022, 3:21 PM IST

मुंबई - मराठी मनोरंजनसृष्टीत सुबोध भावेचे मोठे योगदान आहे. जनमानसात उत्तम प्रतिमा असलेला हा प्रतिभासंपन्न अभिनेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अवतरणार आहे. यावेळेस तो महिला कलाकारांसोबत मजामस्ती करीत एक कार्यक्रम करीत आहे ज्याचे नाव आहे 'बस बाई बस'.

'मी घेऊन आलो आहे महिलांसाठी खास राखीव बस' असं सुबोध भावे याने सांगितल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरु झाली आणि प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे बस बाई बस या कार्यक्रमाची. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुबोध भावे करणार असून या कार्यक्रमात महिला कलाकार सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र सुरु असताना सोशल मीडियावर सुबोध भावेचे भन्नाट सवाल जवाब प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. जसं की 'हॉटेलमधून साबण, शाम्पू घरी घेऊन जाता का?', 'तुम्ही पाणीपुरी खाल्ल्यावर सुकी पुरी मागता का?'. या धमाल प्रश्नावर नेटिझन्सचा तुफान प्रतिसाद तर मिळतोच आहे पण त्याचसोबत अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय सोशल मीडिया अपूर्ण आहे ती म्हणजे मिम्स, ते देखील या सवाल जवाबवर बनताना दिसत आहेत. जर कार्यक्रमाच्या प्रसारणाआधीच सोशल मीडियावर इतकी चर्चा आहे तर कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आल्यावर त्याला भरघोस प्रतिसाद मिळू शकतो.

बस बाई बस हा कार्यक्रम २९ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा -'डार्लिंग'च्या प्रमोशनमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो

ABOUT THE AUTHOR

...view details