महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

मिलिंद शिंदे करतोय ‘देवमाणूस २’ मालिकेत एन्ट्री! - Milind Shinde entry on the small screen

देवमाणूस मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या मालिकेत मार्तंड जामकर यांची एन्ट्री होणार आहे अभिनेते मिलिंद शिंदे या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतील.

मिलिंद शिंदे
मिलिंद शिंदे

By

Published : Apr 25, 2022, 12:24 PM IST

कुठल्याही मालिकेत तगड्या कलाकाराची एन्ट्री होत असते तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता जास्त वाढत असते. सध्या लोकप्रियतेच्या उंचीवर असलेली मालिका ‘देवमाणूस २’ मालिकेत मिलिंद शिंदें सारख्या कसलेल्या अभिनेत्याची एन्ट्री होतेय आणि त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि या मालिकेच्या अफाट लोकप्रियतेमुळेच या मालिकेचं दुसरं पर्व देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आलं.

मिलिंद शिंदे
देवमाणूस च्या दुसऱ्या पर्वाने देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी अजित आणि डिम्पल यांचा लग्नसोहळा पाहिला. पहिल्या पर्वात अजितला पोलीस इन्स्पेक्टर दिव्या सिंग लग्नाच्या मंडपातून खेचून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच लवकरच प्रेक्षकांना मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत मार्तंड जामकर यांची एन्ट्री होणार आहे अभिनेते मिलिंद शिंदे या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येतील.
मिलिंद शिंदे
आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने मिलिंद शिंदे यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली आहे. त्यामुळे आता देवमाणूस या मालिकेत एका रंजक वळणावर मिलिंद शिंदेची मार्तंड जामकर ही भूमिका पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. मार्तंड जामकारमुळे अजितकुमारसमोर कुठलं नवीन आव्हान उभं राहणार अथवा अजितकुमारचा चांगुलपणाचा मुखवटा फाडून त्याचा खरा चेहरा गावकऱ्यांसमोर येईल का हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.या भूमिकेबद्दल बोलताना मिलिंद शिंदे म्हणाले, "देवमाणूस ही मालिका खूपच लोकप्रिय आहे आणि या मालिकेतील अजितकुमारची व्यक्तिरेखा खूप दमदार आहे. या पर्वात मार्तंड जामकर ही महत्वपूर्ण भूमिका मी साकारतोय याचा मला खूप आनंद आहे. याआधी देखील प्रेक्षकांनी माझ्या सर्व भूमिकांना डोक्यावर उचलून धरलं त्यामुळे ही भूमिका देखील त्यांच्या लक्षात राहील आणि त्यांना आवडेल अशी मला खात्री आहे. अजितकुमार आणि मार्तंड यांची जुगलबंदी प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळेल."

ABOUT THE AUTHOR

...view details