महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

डान्सर-अभिनेता-कोरियोग्राफर गश्मीर महाजनी करणार ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ चे परीक्षण! - मुंबई मराठी रिआलिटी शो बातमी

गश्मीर म्हणाला, "हा माझा पहिलाच डान्स रिऍलिटी शो आहे ज्यात मी सहभागी होतोय आणि ते सुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत, याचा मला खूप आनंद आहे. हा कार्यक्रम स्वीकारण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे लहान मुलांसोबत होणारं इंटरॅक्शन. माझं लहान मुलांसोबत कनेक्शन खूप छान जुळतं. त्याचसोबत या कार्यक्रमात मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करताना दिसेन.

actor choreographer gashmir mahajani will examiner of dance maharashtra dance
कोरियोग्राफर गश्मीर महाजनी

By

Published : Jul 16, 2022, 4:14 PM IST

मुंबई -सध्या सर्व प्रकारच्या रियालिटी शोज ना प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळताना दिसतोय. त्यामुळेच जवळपास प्रत्येक वाहिनी कुठला ना कुठला एकतारी रियालिटी शो प्रसारित करताना दिसते. आधी लोकप्रिय असलेले अनेक रियालिटी शोज नवीन सीझन्स घेऊन रुजू होताना दिसताहेत. त्यातीलच एक म्हणजे झी मराठी वरील ‘डान्स महाराष्ट्र डान्स‘. या वेळी यात लहान डान्सर्स थिरकताना दिसतील आणि हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा गश्मीर महाजनी परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहे.

‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ या कार्यक्रमासाठी चिंचि चेटकीण महाराष्ट्रातून खास स्पर्धक शोधून आणतेय. पण या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला होता. या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत एक हरहुन्नरी अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर गश्मीर महाजनी आहे. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच गश्मीर एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याला डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये परीक्षकाच्या खुर्चीत पाहून प्रेक्षकांना, खास करून त्याच्या महिलावर्गातील चाहत्यांना, खूप आनंद होईल यात शंकाच नाही.

आपल्या या जबाबदारीच्या भूमिकेबद्दल बोलताना गश्मीर म्हणाला, "हा माझा पहिलाच डान्स रिऍलिटी शो आहे ज्यात मी सहभागी होतोय आणि ते सुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत, याचा मला खूप आनंद आहे. हा कार्यक्रम स्वीकारण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे लहान मुलांसोबत होणारं इंटरॅक्शन. माझं लहान मुलांसोबत कनेक्शन खूप छान जुळतं. त्याचसोबत या कार्यक्रमात मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करताना दिसेन. प्रेक्षकांनी आता पर्यंत मला विविध चित्रपटांत पाहिलं आहे. एका अभिनेत्या पलीकडे मी एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे अनेकदा मला विचारणा व्हायची की मी डान्सशी निगडित काही करणार आहे की नाही? तर हो आता ती वेळ अली आहे. प्रेक्षकांची जी अपूर्ण इच्छा होती, मला डान्सशी निगडित काहीतरी करताना पाहायची, ती आता पूर्ण होईल कारण प्रेक्षकांना या कार्यक्रमात मी परीक्षण करताना, कधीतरी थिरकताना आणि डान्सशी संबंधित बोलताना दिसेन. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करण्याचं माझं ध्येय आहे, तर लवकरच भेटू डान्स महाराष्ट्र डान्समध्ये."

‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ हा डान्स रियालिटी शो प्रसारीत होणार आहे झी मराठीवर येत्या २७ जुलै पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता

ABOUT THE AUTHOR

...view details