मुंबई - 'बिग बॉस ओटीटी सिझन २' चा सर्वात स्ट्राँग स्पर्धक अभिषेक मल्हान ग्रँड फिनालेच्या एक दिवस आधी रुग्णालयात भरती झाला आहे. या अनपेक्षित ट्विस्टने शोच्या क्लायमॅक्सवर काय परिणाम होतो हे पाहावे लागणार आहे. यामुळे अभिषेक मल्हानचे चाहते काळजी करत आहेत.
अंतिम फेरीच्या आदल्या दिवशी अभिषेकची बहीण, प्रेरणा मल्हान हिने सोशल मीडियावर आपला भाऊ रुग्णालयात असल्याचे त्याच्या चाहत्यांना ट्विटरवर कळवले आहे. सोमवारी रात्री होणाऱ्या फिनालेमध्ये तो असणार नाही याची यामुळे खात्री झाली आहे. १३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या ट्विटरनंतर अभिषेक मल्हानचे चाहते तो बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत.
अभिषेकची बहिण प्रेरणा मल्हान हिने सांगितले की, 'अभिषेकची तब्येत बरी नाही आणि तो हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. त्यामुळे, तो आज रात्री तुमच्यासाठी परफॉर्म करू शकणार नाही. त्याने संपूर्ण सीझनमध्ये आपले भरपूर मनोरंजन केले आहे. तो लवकर लवकर बाहेर येण्यासाठी प्रार्थना करूया.'
अभिषेक मल्हानची तब्येत बिघडल्याच्या घोषणेने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याला ट्विटरवर प्रचंड सदिच्छा पाठवल्या जात आहेत. या अनपेक्षित घटनेने चाहते नाराज झाले आहेत. फिनालेमध्ये तो दिसणार नाही ही कल्पनाच अनेकांना सहन होत नाहीय. तो बरे होण्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार त्याची तब्येत बिघडल्याने त्याला डॉक्टरकडे नेण्यात आले होते. त्याला व्हायरल ताप आणि अंगदुखीचा त्रास असल्याचे समजते. आता त्याची तब्येत बरी असून तो फिनालेमध्ये झळकेल अशाही बातम्या आहेत.
अभिषेक मल्हान रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सुमारे एक आठवडा आरोग्याच्या समस्यांमुळे त्रस्त होता. तरीसुद्धा, अधिकृत बिग बॉस ओटीटी टीमने अद्याप त्याच्या प्रकृतीबद्दल कोणतेही अपडेट शेअर केलेले नाही. आजवरच्या त्याच्या कामगिरीमुळे अभिषेक मल्हान बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये टॉप स्पर्धकांपैकी एक आहे.