महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

‘जिवाची होतिया काहिली' : मराठी आणि कानडी प्रेमिकांची प्रेमकहाणी! - नवी टीव्ही मालिका सुरू होणार

जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत अभिनेता विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्यात ऑनस्क्रीन चुरसदार भांडण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

जिवाची होतिया काहिली
जिवाची होतिया काहिली

By

Published : Jul 15, 2022, 4:30 PM IST

मुंबई- सोनी मराठी वाहिनीवर एक नवी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' ही मराठी आणि कानडी यांच्यातल्या प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. या मालिकेत दोन दिग्गज अभिनेते आमनेसामने असणार आहेत. अस्सल कोल्हापुरी वेशात अभिनेता विद्याधर जोशी तर त्यांच्यावर कानडी तडका द्यायला अभिनेते अतुल काळे असणार आहेत. अभिनेता विद्याधर जोशी आणि अतुल काळे यांच्यात ऑनस्क्रीन चुरसदार भांडण प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांना भावले असून ते मालिका सुरु होण्याची वाट पहात आहेत. पहिल्या झलकीमध्ये प्रेमाला भाषा नसते हे दिसलं तर कानडी आणि मराठीचा झकास तडका दुसऱ्यावेळेस बघायला मिळाला. यात आकर्षण ठरलेत नायक-नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारणारे दोन अनुभवी कलाकार. अर्थातच विद्याधर जोशी आणि अतुल काळे. हे दोन्ही दिग्गज कलाकार नव्या भूमिकांत, नव्या वेशात प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. विद्याधर जोशी यांचा अस्सल कोल्हापुरी वेश तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे. कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यांच्यातलं होणारं चुरसदार भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. हे भांडण रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम करेल, या कलाकारांचं ऑनस्क्रीन चुरसदार भांडण, उडणारे खटके आणि त्यांचा स्वतःचा असा एक भाषेचा ठसका प्रेक्षकांना आवडेल यात शंका नाही. या दोघांमुळे रेवथी आणि अर्जुन यांची प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. या मालिकेत या दिग्गज कलाकरांबरोबर अभिनेत्री सीमा देशमुख आणि भारती पाटील यादेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

'जिवाची होतिया काहिली', ही मालिका १८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.

हेही वाचा -रणबीर कपूरचा दमदार लूक असलेला 'शमशेरा' चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details