मुंबई - दिवंगत टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री तुनिषा शर्माचा मित्र अभिनेता कंवर ढिल्लन याने तिच्यासोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत आणि एक भावनिक संदेश लिहिला आहे. सर्व अडीअडचणीच्या प्रसंगी कंवर तिला महत्त्वाचा व्यक्ती वाटत असे. आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने त्याला फोन का केला नाही, असा सवालही त्याने विचारलाय.
तुनिषा आणि कंवर या दोघांनी इंटरनेट वाला लव्हमध्ये एकत्र काम केले होते. २४ डिसेंबरला तुनिषाला जेव्हा मृतअवल्थेत रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा तिला भेटण्यासाठी धावत आलेला तो पहिला व्यक्ती होता. जेव्हा तुनिषावर नैराश्य आणि चिंताग्रस्त विकारांवर उपचार सुरू होते, तेव्हा ती प्रसारमाध्यमांसमोर कंवर याने केलेल्या मदतीबद्दल त्याचे आभार मानले होते.
सोमवारी कंवरने एका दीर्घ कॅप्शनमध्ये लिहिले: "प्रिय तुनिशा, मला अशा प्रकारे सोडल्याबद्दल मी तुझ्यावर नाराज आहे! एक कॉल करलेती तुनु, सिर्फ एक कॉल. तुझ्या सर्व कठीण लढाईत मी तुझ्याबरोबर आहे, ये भी जीत जाते यार."
"तुझ्या प्रेमळ आईला आणि भरभराटीची कारकीर्द सोडून तू इतक्या लहान वयात गेली आहेस हे मला पटत नाही. तू आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप कष्ट केलेस, ऐसे ही छोड गई?"
तो म्हणाला की तिच्यासोबत घालवलेला वेळ विसरणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. तिच्या आरोग्याच्या समस्यांबाबत तिला मदत करण्यापासून ते तिची पहिली कार खरेदी करताना तिच्यासोबत असण्यापर्यंत, अभिनेत्याने निदर्शनास आणून दिले की तो नेहमीच तिच्यासोबत असतो.