महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Made in Heaven Season 2 : झोया अख्तरचा 'मेड इन हेवन सिझन २' 'या' तारखेला होणार रिलीज - Made in Heaven Season 2 official trailer

'मेड इन हेवन' ही वेब सिरीज २०१९ मध्ये प्रचंड गाजली होती. दोन वेडिंग प्लानर्सची धमाल रहस्यमय कथा भारतीय विवाह सोहळ्यांच्या अनेक गोष्टी सांगणारी आहे. या मालिकेचा दुसरा सिझन आता प्रसारित होणार आहे. १ ऑगस्ट रोजी याचा ट्रेलर रिलीज होणार असून १० ऑगस्टपासून ही मालिका अमेझॉन प्राईमवर प्रसारित होणार आहे.

Made in Heaven Season 2
'मेड इन हेवन सिझन २' या तारखेला होणार रिलीज

By

Published : Jul 31, 2023, 4:22 PM IST

मुंबई - नाट्यमय वेब सिरीजच्या निर्मात्यांनी 'मेड इन हेवन सिझन २' ट्रेलरच्या रिलीज तारखेची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर झोया अख्तरने शोभिता धुलिपाला, कल्की कोयचलीन, जीम सर्भ, मोना सिंग यांच्या पोस्टरची स्ट्रिंग शेअर केली आहे. वेडिंग प्लानर्स वाजत गाजत परतले असल्याचे तिने म्हटले आहे. 'मेड इन हेवन सिझन २' वेब सिरीज १० ऑगस्ट रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रसारित होणार असल्याचेही तिने सांगितले आहे. झोयाने या नवेब सिरीजबद्दलची अपडेट शेअर करताना 'मेड इन हेवन सिझन २' चा ट्रेलर १ ऑगस्ट रोजी रिलीज केला जाणार असल्याचेही चाहत्यांना कळवले आहे.

'मेड इन हेवन' ही लोकप्रिय मालिका २०१९ मध्ये प्रसारित झाली होती. यात शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, जीम सर्भ आणि कल्की कोयचलीन यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता या मालिकेचा दुसरा सिझन १० ऑगस्टपासून प्राईम व्हिडिओ ओटीटीवर रिलीज होईल. नव्या सिझनमध्ये शोभिता धुलिपाला, कल्की कोयचलीन, जीम सर्भ, मोना सिंग, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी आणि विजय राज यांच्या भूमिका असतील.

'मेड इन हेवन' ही दिल्लीत राहणाऱ्या दोन वेडिंग प्लानर्सची कथा आहे. भव्य आणि मोठ्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक आणि आधुनिक आकांक्षा असलेली ही कथा उलगडत जाते. या मालिकेत अनेक रहस्याची उकल झालेली पाहायला मिळणार आहे.

या मालिकेच्या निर्मात्यांनी झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या शोची रिलीज तारीख जाहीर करताना म्हटले की, ' 'मेड इन हेवन' मालिकेने आमच्या ह्रदयात खास जागा निर्माण केली आहे. अनेक सर्जनात्मक उर्जेची जुळणी यात असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. 'मेड इन हेवन' मालिकेचा दुसरा सिझन भारतीय लग्नसोहळ्यांचा सखोल अभ्यास करतो आणि वेगवेगळ्या रंजक कथा सादर करत आहे. आधुनिक भारताचे प्रतिबिंब या मालिकेतून भव्य पद्धतीने दिसणार आहे आणि दोन विवाह संयोजकांच्या माध्यामतून हे कथानक सांगितले जाणार आहे. गेल्या सिझन प्रमाणेच या सिझनलाही प्रेक्षकांचे अलोट प्रेम मिळेल, अशी अपेक्षा आम्ही धरुन आहोत.'

'मेड इन हेवन २' या मालिकेचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव, नरज घायवान, नित्य मेहरा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी केले असून रितेश सिद्धवानी आणि फरहान अख्तरने याची निर्मिती एक्सेल मीडिया अँड एन्टरटेन्मेंट आणि झोया अख्तर आणि रीमा कागती यांच्या टायगर बेबी फिल्म्ससाठी केली आहे. या मालिकेचे ७ एपिसोड्स १० ऑगस्टपासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होतील.

हेही वाचा -

१.Raghava Lawrence Shares First Look : 'चंद्रमुखी २' मधील राघव लॉरेन्सचा 'वेट्टय्यान राजा' फर्स्ट लूक प्रसिद्ध

२.Dream Girl 2 Teaser : 'ड्रीम गर्ल २' चा दिलखेचक टीझर रिलीज, ट्रेलरची प्रतीक्षा सुरू

३.Ghoomer: 'मेलबॉर्न फिल्म फेस्टिव्हल'मध्ये होणार 'घुमर'चा प्रीमियर, मोशन पोस्टर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details