मुंबई :विक्की कौशल आणि सारा अली खान यांच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार झेप घेतली आहे. या चित्रपटाने 19 व्या दिवशी लाखोंची कमाई केली होती. दरम्यान 20व्या दिवशी देखील चित्रपटाच्या कमाईने पुन्हा एकदा 10 कोटींचा पल्ला गाठला आहे. हा चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित झाला आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर चाहत्यांची मने जिंकत आहे. या 20 दिवसांत या चित्रपटाने 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दुसरीकडे १६ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या आदिपुरुष या वादग्रस्त चित्रपटाला झालेल्या प्रचंड विरोधाचा फायदा जरा हटके जरा बचकेला मिळत आहे. या 20 दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे या बातमीद्वारे बघूया...
20 व्या दिवशी किती कमाई केली?: मिमी फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'जरा हटके जरा बचके' हा मध्यमवर्गीय कौटुंबिक चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना विक्की आणि साराची फ्रेश जोडीही पाहायला मिळाली आहे. चाहत्यांना ही जोडी खूप आवडत असून लोकही त्यांना भरभरून प्रेम देत आहेत. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाने 20 व्या दिवशी 1.08 कोटींचा व्यवसाय केला आहे. 19व्या दिवशी 'जरा हटके जरा बचके'ने बॉक्स ऑफिसवर 99 लाख रुपयांची कमाई केली.