मुंबई :विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कामगिरी या आठवड्यात मंदावली आहे. चित्रपट विश्लेषकांच्या अंदाजानुसार हा चित्रपट वीकेंडपर्यंत ५० कोटींचा आकडा पार करेल. या सिनेमाची 8 दिवसांची एकूण कमाई सध्या 40.8 कोटी रुपये आहे. शुक्रवारी या चित्रपटाने 3.42 कोटींची कमाई केली.
बॉक्स ऑफिस कलेक्शन : ट्विटरवर चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी आठवड्याच्या शेवटीच्या अंदाजासह चित्रपटाच्या आठव्या दिवसाचे कलेक्शन शेअर करत ट्विट केले, 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटासाठी दुसऱ्या आठवड्याचा शुक्रवार हा स्थिर होता. आठवड्याच्या शेवटी चित्रपटच्या बिझमध्ये उडी घेण्याची अपेक्षा करा, जर चांगला ट्रेंड सुरू राहिला तर रात्रीपर्यंत ₹50 कोटी आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी एकूण चित्रपटाची कमाई देखील शेअर केली, दुसरा आठवडा शुक्र 3.42 कोटी गुरु 3.24 कोटी. एकूण 40.77 कोटी. इंडिया बिझ असे त्यांनी पोस्टमध्ये लिहले. देशांतर्गत या चित्रपटाचे कलेक्शन शेअर करत त्यांनी पुढे लिहले, देशांतर्गत दोन आठवडे शुक्र 2.12 कोटी पहिला आठवडा बुध 2.05 कोटी आणि गुरु 1.97 कोटी' पहिल्या आठवड्यात एकूण 37.35 कोटी बॉक्स ऑफिसवरची कमाई असे त्यांनी लिहले. निर्माते लक्ष्मण उतेकर यांना या चित्रपटाबाबत फार अपेक्षा होत्या मात्र सध्याला हा चित्रपट फार हळूहळू कमाई करत आहे. आदिपुरुष प्रदर्शित होण्याच्या पूर्वी या चित्रपटाने 50 कोटीचा आकडा पार केला पाहिजे अशी अपेक्षा चित्रपट निर्मात्याची आहे.