महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ZHZB box office day 17: आदिपुरुषच्या रिलीजनंतरही रूपेरी पडद्यावर 'जरा हटके जरा बचके' टिकून - जरा हटके जरा बचके दिवस 17

विक्की कौशल आणि सारा अली खान यांचा नुकताच रिलीज झालेला 'जरा हटके जरा बचके' हा आदिपुरुषच्या रिलीजनंतरही चालत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्स द्वारे बँकरोल केलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटींचा आकडा गाठला आहे.

ZHZB box office day 17
जरा हटके जरा बचके दिवस 17

By

Published : Jun 19, 2023, 4:06 PM IST

मुंबई : विक्की कौशल आणि सारा अली खान यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'जरा हटके जरा बचके' आता रूपेरी पडद्यावर धुमाकुळ घातल आहे. 'आदिपुरुष' सारख्या बलाढ्य चित्रपटासमोर आता देखील हा चित्रपट चालत आहे. सर्वाचा हाच समज होता की 'आदिपुरुष' रिलीज झाल्यानंतर 'जरा हटके जरा बचके' हा फार दिवस काही टिकणार नाही. मात्र या चित्रपटाने सर्वांना चुकीचे ठरविले आहे. मध्य-बजेटचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आता देखील चालत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, या चित्रपटाने तीन आठवडे पूर्ण केले आहे. समीक्षेचा विचार केला तर, जरा हटके जरा बचके या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंत केले आहे. मात्र आदिपुरुष या चित्रपटाला देशभरातून विरोध केल्या जात आहे. सुरुवातीला या चित्रपटाचा क्रेझ फार जास्त प्रमाणात होता मात्र सध्याला काही भागातून या चित्रपटाला विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र तरीही 'आदिपुरुष'चा क्रेझ आता देखील आहे. तसेच 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 70 कोटी रुपयांचा आकडा गाठला आहे. तिसर्‍या रविवारी 'जरा हटके जरा बचके'ने बॉक्स ऑफिसवर वाढ पाहिली. चित्रपटाने वाढीचा कल पाहत रु. 2.34 कोटी कमावले. तिसर्‍या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने 5.31 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

जरा हटके जरा बचके दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन पहा:

दिवस 1 रु 5.49 कोटी

दिवस 2 रु 7.20 कोटी

दिवस 3 रु. 9.90 कोटी

दिवस 5 रु 4.14 कोटी

दिवस 6 रु. 3.87 कोटी

दिवस 7 रु. 3.51 कोटी

दिवस 8 रु. 3.24 कोटी

दिवस 9 रु 5.76 कोटी

दिवस 10 रु 7.02 कोटी

दिवस 11 रु. 2.70 कोटी

दिवस 12 रु. 2.52 कोटी

दिवस 13 रु. 2.25 कोटी

दिवस 14 रु 1.95 कोटी

दिवस 15 रु 1.08 कोटी

दिवस 16 रु. 1.89 कोटी

दिवस 17 रु 2.34 कोटी

एकूण: भारतात 68.31 कोटी नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन

जरा हटके जरा बचके आठवड्यानुसार नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन इंडिया :

पहिला आठवडा: रु. 37.35 कोटी

आठवडा 2: रु 25.65 कोटी

वीकेंड 3 : रु 5.31 कोटी

जरा हटके जरा बचके यश : जरा हटके जरा बचकेचे व्यावसायिक यश हे सारा आणि विक्कीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सद्वारे बँकरोल केलेल्या चित्रपटाने चित्रपट निर्मात्यांना मध्यम आकाराच्या चित्रपटांसाठी थिएटरमध्ये जाण्यासाठी विश्वास निर्माण करण्यात यश आता मिळविले आहे कारण सर्वाचा हाच समज असायचा की, मध्य बजेटचे चित्रपट रूपेरी पडद्यावर चालत नाही त्यामुळे अनेक निर्मात्यांन ओटीटीचा मार्ग निवडला होता.

हेही वाचा :

  1. Adipurush box office collection day 3: प्रभासच्या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये गाठला 300 कोटींचा टप्पा
  2. Movie clash: 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटासोबत भिडणार शाहिद कपूरचा 'अ‍ॅन इम्पॉसिबल लव्ह स्टोरी'
  3. Demand To Ban Adipurush: संपूर्ण देशात 'आदिपुरुष' या चित्रपटावर बंदीची मागणी, भाजप नेत्यांनीही केला निषेध

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details