मुंबई :विक्की कौशल आणि सारा अली खान यांचा नुकताच रिलीज झालेला 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाला दुसरा वीकेंड सर्वोत्तम ठरला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या 10 व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाने 5.49 कोटी रुपयांने सुरुवात केली त्यानंतर या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये चांगली कमाई केली. मात्र आठवड्याच्या काही दिवसात चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण झाली परंतु त्यानंतर ती स्थिर राहिली. चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतर कमाईच्या आकड्यात थोडी वाढ दिसून आली.
10 दिवसाचे कलेक्शन : 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर बॉक्स ऑफिसमधील 10 दिवसाचे कलेक्शन शेअर केले आहे. चित्रपटाने 7.02 कोटी रुपयांचा नोंदणीकृत व्यवसाय केला आहे जो 9 व्या दिवसाच्या कलेक्शनपेक्षा मोठा आहे. 'जरा हटके जरा बचके'च्या पहिल्या आठवड्यातील कलेक्शन 37.35 कोटी रुपये होते तर दुसऱ्या आठवड्यात 16.20 कोटी रुपये इतके होते, ज्यामुळे चित्रपटाच्या रिलीजच्या 10 दिवसांनंतर देशांतर्गत एकूण 53.55 कोटी रुपये कमाई झाली आहे.
जरा हटके जरा बचके बॉक्स ऑफिसवर कलेक्शन:
दिवस 1 रु 5.49 कोटी
दिवस 2 रु 7.20 कोटी
दिवस 3 रु. 9.90 कोटी
दिवस 5 रु 4.14 कोटी
दिवस 6 रु. 3.87 कोटी
दिवस 7 रु. 3.51 कोटी