मुंबई :विक्की कौशल आणि सारा अली खान यांचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके' हा 2 जून रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी फार धुमाकुळ घातले होते, मात्र तीन दिवसानंतर या चित्रपटाने मंद गतीने कमाई केली. हा चित्रपट फार मनोरंजक होता. या चित्रपटाचे एकून कलेक्शन किती झाले याबद्दल अनेकदा चित्रपट विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरवर काही आकडे शेअर केले होते. त्यानंतर बरेच काही या चित्रपटाबद्दल चित्र स्पष्ट झाले होते. आता सध्याला प्रभास आणि क्रिती सॅनन स्टारर आदिपुरुष आज मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. त्यामुळे 14 व्या दिवशी, 'जरा हटके जरा बचके'ने बॉक्स ऑफिस कमाईमध्ये घसरण पाहिली आहे. चित्रपट निर्मात्यांनी सोशल मीडियावर बॉक्स ऑफिस कलेक्शनाबद्दल एक अपडेट शेअर केली आहे. रोमँटिक कॉमेडी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाने देशांतर्गत बाजारात 14 व्या दिवशी 1.95 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाची एकूण कमाई 63 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
जरा हटके जरा बचके बॉक्स ऑफिस कलेक्शनवर एक नजर टाका:
दिवस 1 रु 5.49 कोटी
दिवस 2 रु 7.20 कोटी
दिवस 3 रु. 9.90 कोटी
दिवस 5 रु 4.14 कोटी
दिवस 6 रु. 3.87 कोटी
दिवस 7 रु. 3.51 कोटी
दिवस 8 रु. 3.24 कोटी
दिवस 9 रु 5.76 कोटी
दिवस 10 रु 7.02 कोटी
दिवस 11 रु. 2.70 कोटी
दिवस 12 रु. 2.52 कोटी
दिवस 13 रु. 2.25 कोटी
दिवस 14 रु 1.95 कोटी
एकूण: भारतात 63 कोटी नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन
'जरा हटके जरा बचके' चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट : 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट ४० कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. दिनेश विजानच्या मॅडॉक फिल्म्सद्वारे बँकरोल केलेला, कौटुंबिक मनोरंजन करणारा हा चित्रपट रिलीजच्या 10 व्या दिवशी 50 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर हिट घोषित करण्यात आला. निर्मात्यांनी त्यांच्या मध्यम आकाराच्या चित्रपटाचे व्यावसायिक यशही मुंबईत मोठ्या थाटात साजरे केले.
बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई :ट्विटरवर चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी आठवड्याच्या शेवटीच्या अंदाजासह चित्रपटाच्या आठव्या दिवसाचे कलेक्शन शेअर करत ट्विट केले, 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटासाठी दुसऱ्या आठवड्याचा शुक्रवार हा स्थिर होता. आठवड्याच्या शेवटी चित्रपटच्या बिझमध्ये उडी घेण्याची अपेक्षा करा, जर चांगला ट्रेंड सुरू राहिला तर रात्रीपर्यंत 50 कोटी आकडा ओलांडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी एकूण चित्रपटाची कमाई देखील किती झाली आहे हे देखील या ट्विटमध्ये सांगितले होते.
हेही वाचा :
- Adipurush Movie : थिएटरच्या झरोक्यातून माकडाने पाहिला 'आदिपुरुष' !
- Adipurush seat reserved : आरक्षित खुर्चीवरुन बजरंगी बलीने पाहिला आदिपुरुष, थिएटरमधील व्हिडिओ व्हायरल
- Vitthal Maja Sobti : वारकऱ्याच्या भेटी विठ्ठल तो आला, भक्तीमय रंजक कथा 'विठ्ठल माझा सोबती'