मुंबई :विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये १८ व्या दिवशी घट झाली. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवत दररोज सुमारे २ कोटी रुपये कमावले. दरम्यान, 19 जून रोजी म्हणजे 18 व्या दिवशी चित्रपटाने केवळ 1 कोटी रुपयांची कमाई केली.
जरा हटके जरा बचके 18व्या दिवशीची कमाई : आदिपुरुष या चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीजचा परिणाम विक्की आणि साराच्या रोमँटिक कॉमेडी चित्रपटावर झाला आहे. जरा हटके जरा बचके या चित्रपटाची कहाणी ही नवविवाहित जोडप्याची आहे ज्यांना संयुक्त कुटुंबातील सदस्यांनी वेढलेले आहे. या जोडप्याला एकत्र वेळ घालवाचा असतो, मात्र संयुक्त कुटुंब असल्यामुळे या गोष्टी शक्य होत नाही. मध्यमवर्गीय असल्यामुळे त्यांना वेगळे घर घेणे शक्य होत नाही. त्यामुळे दोघेही ‘जन आवास योजने’द्वारे नवीन घर घेण्याचा विचार करतात. त्यामुळे दोघे घटस्फोट घेण्याचे नाटक करत असतात.
देशांर्तग एकूण कलेक्शन :जरा हटके जरा बचकेने 2 जून रोजी थिएटरमध्ये पदार्पण केले आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी अंदाजे 5.49 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यानंतर कमाईत घट दिसून येत आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्या म्हणण्यानुसार, 18 दिवसांनंतर चित्रपटाचे देशांर्तग एकूण कलेक्शन 69.39 कोटी रुपये इतके आहे.
जरा हटके जरा बचकेचे दिवसानुसार बॉक्स ऑफिस कलेक्शन पहा:
दिवस 1 रु 5.49 कोटी
दिवस 2 रु 7.20 कोटी
दिवस 3 रु. 9.90 कोटी
दिवस 5 रु 4.14 कोटी
दिवस 6 रु. 3.87 कोटी
दिवस 7 रु. 3.51 कोटी
दिवस 8 रु. 3.24 कोटी
दिवस 9 रु 5.76 कोटी