महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ZHZB BOX OFFICE COLLECTION DAY 28 : 'जरा हटके जरा बचके'ने 28 व्या दिवशी केली एक कोटींपेक्षा कमी कमाई - जरा हटके जरा बचके

विक्की कौशल आणि सारा अली खान स्टारर चित्रपट 'जरा हटके जरा बचके' 2 जून रोजी प्रदर्शित झाला आणि आतापर्यत देखील हा चित्रपट रूपेरी पडद्यावर टिकून आहे. मात्र 28व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे.

ZHZB BOX OFFICE COLLECTION DAY 28
'जरा हटके जरा बचके' बॉक्स ऑफिस कलेक्शन

By

Published : Jun 30, 2023, 11:26 AM IST

मुंबई :अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके' 2 जून रोजी प्रदर्शित झाला आणि अजूनही बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे, प्रभास आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट 'आदिपुरुष' 16 जून रोजी प्रदर्शित झाला. मात्र 'जरा हटके'. जरा बचके'च्या कमाईमध्ये या चित्रपटामुळे काहीही परिणाम झाला नाही. हा चित्रपट आता देखील रूपेरी पडद्यावर चालत आहे. 29 जून रोजी बकरीदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कथा बिघडवली आहे. 'जरा हटके जरा बचके'चा आज 30 जून रोजी रिलीजला 29 वा दिवशी चालू झाला आहे, आणि चित्रपटाच्या 28व्या दिवसाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे.

जरा हटके जरा बचकेची २८ व्या दिवसाची कमाई : 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट आतापर्यंत करोडो रुपयांची कमाई करत होता आणि आता 'सत्यप्रेम की कथा' रिलीज झाल्याने 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची कमाई निम्म्यावर आली आहे. विक्की कौशल आणि सारा अली खानचा चित्रपट ;जरा हटके जरा बचके' आता बॉक्स ऑफिसवर घसरताना दिसत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 28 व्या दिवशी चित्रपटाने 50 लाख रुपये (अंदाजे) कमावले आहेत.

जरा हटके जरा बचकेचे एकूण कलेक्शन : जरा हटके जरा बचकेचे 28व्या दिवशीचे एकूण कलेक्शन 82.31 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटासाठी आणखी कमाई करणे कठीण होणार आहे, कारण कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने पहिल्या दिवशी (२९ जून)ला प्रदर्शित झाल्यानंतरच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 9 कोटी रुपयांचा (अंदाजे) व्यवसाय केला आहे. हा जरा हटके जरा बचके हा चित्रपट फार दिवसापासून रूपेरी पडद्यावर टिकून आहे. मात्र आता 'सत्यप्रेम की कथा' आणि आदिपुरुष समोर हा चित्रपट किती काळ टिकून राहतो हे बघणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. SPKK MOVIE : 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट ब्लॉकबस्टर घोषीत झाल्यावर कार्तिक आर्यन पोहोचला सिद्धिविनायक मंदिरात
  2. Chandramukhi 2 Release Date : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार 'चंद्रमुखी 2'
  3. Animal Movie : रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल'च्या सेटवरील फोटो व्हायरल...

ABOUT THE AUTHOR

...view details