मुंबई: अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा चित्रपट 'जरा हटके जरा बचके'ने 8 जून रोजी बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण केला आहे. तसेच या चित्रपटाची सहाव्या दिवसाची कमाई ही समोर आली आहे. पहिल्या दिवशी 5 कोटींहून अधिक कमाई करणारा हा चित्रपट 6 दिवसांत आपल्या चित्रपटाचा खर्चही वसूल करू शकला नाही आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे जगभरातील एकूण कलेक्शन आता 30 कोटींहून अधिक झाले आहे मात्र हे बजट 35 कोटींपेक्षा कमी आहे.
चित्रपटाची सहाव्या दिवसाची कमाई : या चित्रपटाने सहाव्या दिवशी 7 जूनला जगभरात 3.51 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे आणि देशांतर्गत सिनेमाने 2.05 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 34.11 कोटींवर गेली आहे. आता एका आठवड्याच्या कलेक्शनमध्ये हा चित्रपट आपला खर्च वसूल करू शकेल का, हे बघणे फार महत्वाचे ठरणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईसह, चित्रपटाने पहिल्या दिवशी 5.49 कोटी जगभरात आणि 3.35 कोटी देशांतर्गत , दुसऱ्या दिवशी 7.20 कोटी जगभरात आणि 4.55 कोटी देशांतर्गत, 9.90 कोटी जगभरात आणि 5.78 कमाई कोटी तिसर्या दिवशी तसेच चौथ्या दिवशी देशांतर्गत 4.14 कोटी जगभरात 2.40 कोटी , पाचव्या दिवशी देशांतर्गत 3.87 कोटी जगभरात 2.27 कोटी आणि 6 व्या दिवशी देशांतर्गत, 3.51 कोटी 2.05 कोटी जगभरात कमाई केली आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई 34.11 कोटींवर गेली आहे