मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री झायरा वसीम हिने हिजाब घालण्याच्या महिलेच्या पसंतीच्या बाजूने सोशल मीडिया वापरकर्त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. 2019 मध्ये केवळ तीन चित्रपटांच्या छोट्या कार्यकाळानंतर चित्रपट झायरा वसीम चित्पटसृष्टीला रामराम ठेकला होता. हे क्षेत्र तिच्यासाठी विसंगत असल्याचे कारण देत तिने फिल्म इंडस्ट्री सोडली होती.
झायरा वसीमने ट्विटरवर नेटिझनची पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये एका महिला नकाब न काढता अन्न खाताना दिसत आहे. असं माणसानं वागावं का या प्रश्नाला उत्तर देताना तिने लिहिले, 'मी नुकतीच एका लग्नातून परतले. यात दाखवल्याप्रमाणेच मी खाल्ले. हा सर्व माझा निर्णय होता. जरी माझ्या आजूबाजूचे सर्वजण मला माझा नकाब काढण्याचा आग्रह करत असले तरी मी तसे केले नाही. आम्ही तुमच्यासाठी हे करत नाही.'
तिचे ट्विट मोठ्या प्रमाणावर रिट्विट केले गेले आणि हिजाबचा वाद पुन्हा एकदा पेटला. अनेक सोशल मीडिया यूजर्स तिला पाठींबा देण्यासाठी सरसावले. असे असले तरी तिच्यावर प्रचंड टीकाही होत आहे. एकाने लिहिले, 'आता काय आहे नकाब? हिजाब बुरखा आणि आता हा!! एक नवीन प्रकार??'