महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

YRF Spy Universe: स्पाय युनिव्हर्ससाठी आदित्य चोप्राने आलिया भट्टची का केली निवड? जाणून घ्या - वॉर २मध्ये आलिया भट्ट

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समध्ये आता महिला गुप्तहेर म्हणून आलिया भट्ट झळकणार आहे. आजवरच्या चित्रपटात दीपिका, कतरिनासारख्या अभिनेत्री को स्पाय म्हणून सहभागी झाल्या होत्या. महिला गुप्तहेराची नवी फ्रँचाइज सुरू करण्याचा विचार करताना आदित्य चोप्राने आलिया भट्टला प्राधान्य दिले आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बातमी वाचा.

YRF Spy Universe
महिला गुप्तहेराची नवी फ्रँचाइज सुरू

By

Published : Jul 14, 2023, 2:36 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार आलिया भट्ट आदित्य चोप्राच्या गुप्तहेर विश्वात शाहरुख खान, ह्रतिक रोशन, सलमान खान प्रमाणे सामील होत आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर' आणि 'पठाण' या गुप्तहेर चित्रपटानंतरच्या साखळीत आता आलिया भट्ट गुप्तहेर म्हणून वावरताना दिसणार आहे. अद्याप शीर्षक न ठरलेला यश राज फिल्म्सचा हा चित्रपट २०२४ मध्ये फ्लोअरवर जाईल.

'आलिया ही आता भारताची मोठी सुपरस्टार बनली आहे आणि ती आता गुप्तहेर म्हणून मनोरंजन करण्यासाठी सज्ज होईल. हा एक खुर्चीला खिळवून ठेवणारा नेत्रदीपक थरारपट असेल. शत्रूंचा निःपात करण्यासाठी मोहिमेवर निघालेल्या आलियाला यशराज फिल्म्सच्या या नव्या चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन करताना आपण पाहू शकू', असे यशराज फिल्म्सच्या वतीने सांगण्यात आले.

'यशराज फिल्म्सच्या या शीर्षक न ठरलेल्या चित्रपटात आलिया आजवर कधीही न पहिलेल्या अवतारात झळकेल. आलिया ही भारताच्या नव्या पिढीची मोठी सुपरस्टार आहे. ती साकारत असलेली गुप्तहेर एजंट ही सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजक असेल. आलिया ही आजच्या काळातील सर्वात मोठी एन्टरटेनर आहे आणि यशराजचे गुप्तहेर विश्व ती आपल्या उपस्थितीने भक्कम बनवेल', असेही सांगितले गेले.

अगोदर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार आलिया भट्ट ही अभिनेता ह्रतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्या 'वॉर २' मध्ये झळकणार होती. परंतु आदित्य चोप्राला तिची क्षमता माहिती असल्याने तिच्यासह नवी फ्रँचाइज सुरू करण्याचा तो विचार करत आहे. हा एक आश्चर्यकारक चित्रपट बनवण्याचा त्याने निर्णय घेता आहे. याच्या निर्मितीसाठी काहीही हातचे राखून न ठेवता मोठे बजेट लावण्याचा निर्णय यशराज फिल्म्स घेणार आहे. आजवरच्या त्यांच्या स्पाय युनिव्हर्सला प्रेक्षकांनी उदंड प्रतासाद दिला आहे. कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोण यांनीही यात पूर्वी काम केलंय. परंतु त्या भूमिका सहाय्यक गुप्तहेरांच्या होत्या. आता महिला गुप्तहेर म्हणून आक्रमक स्वरुपात आलिया भट्टला प्रेझेन्ट करण्याचा निर्णय आदित्य चोप्राने घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details