महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Filmmaker Sandeep Singh Threat Case : हिंदी चित्रपट निर्माते संदीप सिंह धमकीप्रकरणी तरुणाला बिहारमधून अटक; सिद्धु मुसेवालाप्रमाणे ठार मारण्याची धमकी - Krishna Murari Arrested by Mumbai Police

बॉलिवूड चित्रपट निर्माते संदीप सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ( Threatening to Kill Filmmaker Sandeep Singh ) तरुणाला बिहारमधील सिवान येथून मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. आरोपी तरुणाने फेसबुकच्या ( Mumbai Police Arrested One Accused From Bihar ) माध्यमातून संदीप सिंगला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव 20 वर्षीय कृष्णा मुरारी असून तो सिवान जिल्ह्यातील जिरादेई पोलिस स्टेशन अंतर्गत भैंसखल गावचा रहिवासी आहे.

Filmmaker Sandeep Singh Threat Case
हिंदी चित्रपट निर्माते संदीप सिंह धमकीप्रकरणी

By

Published : Sep 5, 2022, 11:59 AM IST

मुंबई : बॉलिवूड निर्माता संदीप सिंग यांना, तुझा पण सिद्धू मुसेवाला करू, अशी फेसबुक वरून धमकी ( Threatening to Kill Filmmaker Sandeep Singh ) देणाऱ्या इसमास मुंबई पोलिसांनी अटक ( Mumbai Police Arrested One Accused From Bihar ) केली आहे. बिहार येथून 21 वर्षीय कृष्णा मुरारी या इसमाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली असून, त्याला मुंबईत आणण्यात येत आहे.


चित्रपट निर्माते संदीप सिंग धमकीप्रकरणी तरुणाला मुंबई पोलिसांकडून अटक : प्रसिद्ध हिंदी चित्रपट निर्माते संदीप सिंग यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी थेट 21 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जुलै 2022 मध्ये संदीप सिंग यांच्या फेसबुकवर धमक्या पोस्ट केल्या गेल्या होत्या. त्यानंतर अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. संदीप सिंग अंधेरी पश्चिम येथे राहतात. त्यांनी सरबजीत, अलीगढ, झुंड आणि पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सिद्धू मुसेवाला करण्याची धमकीप्रकरणी :सिद्धू मुसेवाला करण्याची धमकीप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक युजरने संदीप सिंग यांच्या टाइमलाइनवर धमकीचा संदेश पोस्ट केला होता. ज्यामध्ये लिहिले होते, “तुझे सिद्धू मुसेवाला की तरह मार दूंगा याद रख." मुसेवाला या पंजाबी गायकाची 29 मे रोजी त्याच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावर असताना सहा जणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. संदीप सिंग यांनी आंबोली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, 6 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

६ जुलै रोजी फेसबुकवर धमकी : सिवान जिल्ह्यातील जिरादेई पोलीस स्टेशन परिसरातील भैंसा खाल येथील रहिवासी असलेल्या कृष्णा मुरारी यांनी ६ जुलै रोजी फेसबुकच्या माध्यमातून धमकीची पोस्ट लिहिली होती आणि त्यात म्हटले होते की, काळजी करू नका सिद्धू मुसेवाला यांना गोळ्या घालण्यात आल्या. तशाच प्रकारे तुम्हालाही मारले जाईल, असे होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली आणि चित्रपट निर्मात्याने महाराष्ट्रातील अंबोली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यानंतर आरोपी कृष्णा मुरारीला मुंबई पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

हेही वाचा :Amit Shah Mumbai Visit Today : अमित शहा आज घेणार मुंबईतील विविध मंडळांच्या गणपतींचे दर्शन; CM सोबतही बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details