मुंबई - Year Ender 2023 :भारतीय चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक चित्रपट आणि वेब सीरीज या रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत असतात. काही चित्रपट किंवा वेब-सीरीज चांगली खळबळ उडवून देतात. दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही बॉलिवूड आणि साऊथमधून अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि साऊथचा सुपरस्टार विजय स्टारर चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. हे चित्रपट अनेकांना खूप आवडले. 2023 मध्ये सर्वात जास्त वाद अडकलेला चित्रपट 'आदिपुरुष' हा अनेकांनी नाकारला होता. आज आपण 2023 मधील काही विशेष चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत.
'पठाण' :शाहरुखनं 'पठाण' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. 'पठाण'च्या 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगावरून बराच वाद झाला होता आणि चित्रपटाबाबत देशभरात निदर्शने झाली होती. शाहरुख आणि दीपिकाला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची एकूण कमाई 1048 कोटी आहे.
'द केरल स्टोरी' : 'द कश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी 2023 मध्ये देखील आपल्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने देशभरात खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटातील धर्मांतराचा मुद्दा देशभरात तापला होता. द केरळ स्टोरी'नं बॉक्स ऑफिसवर 303.97 कोटीची कमाई केली होती. हा चित्रपट 5 मे 2023 प्रदर्शित झाला होता.
'आदिपुरुष' :2023 मधील सर्वात वादग्रस्त चित्रपट 'आदिपुरुष' होता. प्रभास स्टारर हा चित्रपट 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या असून दिग्दर्शक ओम राऊत यांना देशातच नव्हे, तर परदेशातही शिवीगाळ करण्यात आली. हा चित्रपट रामायणावर आधारित होता. आदिपुरुषमधील राम, रावण आणि हनुमानाच्या लूक हे खूप चर्चेत होते. अनेकांनी या चित्रपटाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती. 'आदिपुरुष'चा संवाद खूप हास्यास्पद आणि असभ्य असल्यानं या चित्रपटावर बंदी यावी अशी मागणी करण्यात आली होती. 'आदिपुरुष'नं 353 कोटीचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता.