मुंबई- Year-ender 2023: 2023 हे वर्ष स्टार किड्ससाठी संस्मरणीय ठरले. अनेक नवोदित कलाकार रुपेरी पडद्यावर झळकले आणि लोक कितीही नेपोटिझमवर चर्चा करत राहिले तरी त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची हमी घेतली. सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा, राजवीर देओल, पलोमा ढिल्लॉन, पलक तिवारी आणि अलिझेह अग्निहोत्री इत्यादी स्टार किड्सनी 2023 मध्ये त्यांच्या सिनेमॅटिक प्रवासाला सुरुवात केली. प्रकाशाच्या झोतात आल्यानंतर स्टार किड्सना अपेक्षांचा भार सहन करावा लागतो. ते केवळ स्टार्सची मुले असतात म्हणून दबाव असतो असे नाही तर आपल्या प्रतिभेनं प्रेक्षकांची मने जिंकण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते.
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहानाने अभिनयात प्रवेश केल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. त्याचप्रमाणे, चित्रपट निर्माता बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर यांचे बहुप्रतिक्षित अभिनयाचे स्वप्न अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत 'द आर्चीज' चित्रपटामधून साकार झाले. 2023 मध्ये पदार्पण केलेल्या इतर स्टार किड्समध्ये सनी देओलचा धाकटा मुलगा राजवीर देओलचा समावेश आहे ज्याने 'दोनो' नावाच्या रोमँटिक चित्रपटातून पदार्पण केले होते. यामध्ये त्याने जुन्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री पूनम ढिल्लॉनची मुलगी पलोमा ढिल्लॉनसोबत भूमिका साकारली होती.
यावर्षी सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीने 'फर्रे' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यावेळी टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिनेही 'किसी का भाई किसी की जान'मधील कलाकारांसह अभिनय पदार्पण केले. या मुलांनी आपले भवितव्य ठरवण्यासाठी स्वतःला प्रेक्षकांच्यासमोर ठेवले. त्यांचा अभिनयातील पहिला कार्यकाळ आणि त्याचे स्वागत प्रेक्षकांनी कसे केले यावर एक नजर टाकूया.
सुहाना खान
झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चिज' हा बहुप्रतीक्षित चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि इंटिरियर डिझायनर गौरी खान यांची मुलगी स्टार किड सुहाना खानने या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेचच या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. समीक्षकांप्रमाणेच नेटिझन्सनीही चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. असे असले तरी नेटिझन्समध्ये वेरोनिकाची भूमिका करणाऱ्या सुहानाच्या या चित्रपटातील अभिनयाबाबत मतभिन्नता होती. यातील तिची व्यक्तीरेखा, नृत्यशैली यावर अनेकजण फिदा झाल्याचंही पाहायला मिळालं.
खुशी कपूर
खुशी कपूरने बॉलीवूडमध्ये बेटी कूपरच्या व्यक्तीरेखेतून पदार्पण केले. हा चित्रपट जगभर गाजलेल्या लोकप्रिय कॉमिक्स 'द आर्चीज'चे भारतीय रुपांतर होते. प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार जान्हवी कपूरच्या पदार्पणापेक्षही तिचे पदार्पण सरस ठरले. खुशी ही सशक्त कलाकार असून तिने आपल्या पात्राला न्याय दिल्याचे प्रेक्षकांना वाटले.
अगस्त्य नंदा
झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' हा किशोरवयीन म्युझिकल कॉमेडी चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांसाठी प्रवाहित झाला. यातील नवोदित अगस्त्य नंदाच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अगस्त्य नंदा यांनी त्यांच्या आर्चीच्या भूमिकेत त्यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवली. अनेकांसाठी तो इनोसंट क्रश ठरला. त्याच्या अभिनयामुळे त्याचे आजोबा अमिताभ बच्चन आणि बहीण नव्या नवेली नंदा यांच्याकडून त्याचं कौतुक झालं. तो श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांचा मुलगा आहे.
अलिझेह अग्निहोत्री