मुंबई Year Ender 2023 :वर्ष 2023 हे आता काही दिवसात संपणार आहे. शेवटचा महिना डिसेंबर अर्धा संपला असून अनेकजण नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनची तयारीत करत आहेत. वर्ष 2023 बॉलिवूडच्या दृष्टीने हिट ठरले आहे. याशिवाय 2022 वर्ष साऊथ सिनेमासाठी चांगले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील या वर्षी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. 2023 मध्ये, बॉलिवूडमधील एकामागून एक हिट गाण्यांनी अनेकांचे मनोरंजन केले. 2023 च्या आठवणी ताज्या करताना, आपण काही हिंदी गाण्यांबद्दल बोलणार आहोत. या हिंदी गाण्यांनी आपलं खूप मनोरंजन केलं आहे.
जमाल कुडू गाणं :अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'अॅनिमल' या चित्रपटातील बॉबी देओलच्या 'जमाल कुडू' या गाण्यानं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या गाण्याला अवघ्या काही तासांत दशलक्ष व्ह्यूज मिळाले. या गाण्यावर बरीच रील्स बनवली जात आहेत. 'जमाल कुडू' हे 2023चं हिट गाणं ठरलं आहे. (व्ह्यूज- 18 दशलक्ष तीन दिवसांपूर्वी रिलीज)
सारी दुनिया जला देंगे गाणं : 'अॅनिमल' चित्रपटातील 'सारी दुनिया जाला देंगे' हे गाणंही लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. हे गाणं पंजाबी गीतकार जानी यांनी लिहिलं असून गायक बी प्राक यांनी उत्तम गायलं आहे. (व्ह्यूज- 36 दशलक्ष)
अर्जन व्हॅली : 'अॅनिमल'चे तिसरे हिट गाणे 'अर्जन व्हॅली' देखील चार्टबस्टर्समध्ये अव्वल आहे. हे गाणं पंजाबी गायक भूपिंदर बब्बलनं गायलं आहे. या गाण्याला अनेकजण खूप पसंत करत आहेत. (व्ह्यूज- 86 दशलक्ष)
प्यार होता-होता पहली बार : अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी में मक्कर' या चित्रपटातील 'प्यार होता-होता पहली बार' हे गाणं देखील हिट झालं आहे. या गाण्याची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. (व्ह्यूज- 113 दशलक्ष)
फिर और क्या चाहिए : हिंदी चित्रपट सृष्टीचा अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटातील 'फिर और क्या चाहिये' हे गाणं आजही ऐकायला मिळत आहे. हे गाणं अरिजित सिंगनं गायलं आहे. (व्ह्यूज- 221 दशलक्ष)