मुंबई - Year Ender 2023 : हिंदी आणि साऊथ चित्रपटसृष्टीसाठी 2023 वर्ष खूप फायदेशीर ठरलं. या चित्रपटांनी यमदी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. डिसेंबर 2023मध्ये अभिनेता शाहरुख खान अभिनीत 'डंकी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर चांगली कामगिरी करत आहे. याशिवाय प्रभास स्टारर 'सालार' चित्रपट प्रचंड कमाई बॉक्स ऑफिसवर करताना दिसत आहे. आज इयर एंडर 2023 च्या लेखात आपण त्या चित्रपटांबद्दल बोलणार आहोत, ज्यांना सेन्सॉर बोर्डानं 'ए' प्रमाणपत्र दिलं होतं आणि या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.
द केरल स्टोरी :अभिनेत्री अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डानं 'ए' प्रमाणपत्र दिलं होतं. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. जगभरात 'द केरळ स्टोरी'नं 303.97 कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला.
ओएमजी 2 : अभिनेता अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम स्टारर चित्रपट 'ओएमजी 2'ला 'ए' प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 221.08 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे लोकांनी खूप कौतुक केलं. 'ओएमजी 2'चं दिग्दर्शन अमित राय यांनी केलं आहे.