महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Year Ender 2022: या वर्षी सर्वात मोठे व्यावसायिक हिट्स देणारे १० अभिनेते

२०२२ मध्ये भारतातील सर्वच सिने उद्योगात भरपूर सिनेमांची निर्मिती झाली, पण यात खऱ्या अर्थाने दबदबा निर्माण केला तो दाक्षिणात्य चित्रपटांनी. वर्षाला निरोप देताना जाणून घेऊयात २०२२ मध्ये व्यावसायिकदृष्ठ्या हिट ठरलेल्या अभिनेत्यांबद्दल.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 26, 2022, 10:51 AM IST

Updated : Jan 1, 2023, 7:40 AM IST

मुंबई- कोरोनाचा त्रासदायक काळ संपल्यानंतर सर्व उद्योगाप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीतही चैतन्य पाहायला मिळाले. प्रेक्षक पुन्हा एकदा चित्रपटगृहाकडे परतले आणि बॉक्स ऑफिसवर गल्ला जमा होण्यास सरवात झाली. २०२२ मध्ये भारतातील सर्वच सिने उद्योगात भरपूर सिनेमांची निर्मिती झाली, पण यात खऱ्या अर्थाने दबदबा निर्माण केला तो दाक्षिणात्य चित्रपटांनी. वर्षाला निरोप देताना पाहूयात २०२२ मध्ये व्यावसायिकदृष्ठ्या हिट ठरलेल्या अभिनेत्यांबद्दल.

1. यश

नवीन कुमार गौडा हा यश या नावानेच ओळखला जातो. यावर्षी त्याचा बहुप्रतीक्षित केजीएफ २ ( K.G.F Chapter 2) हा चित्रपट सुपरहिट ठरला. या कन्नड चित्रपटाने सुमारे 1,000 कोटी रुपयांचा एकूण देशांतर्गत व्यवसाय केला आणि इतकेच नाही तर या चित्रपटाने जगभरात 1,200 कोटींहून अधिक कमाई केली (एकूण).

2. राम चरण

राम चरणने 2022 चा दुसरा सर्वात मोठा हिट चित्रपट दिला आरआरआर. एसएस राजामौली दिग्दर्शित, राम चरण अभिनीत या चित्रपटाने देशांतर्गत सुमारे 944 कोटी रुपये कमावले. जगभरात एकूण 1,130 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. या चित्रपटाने दोन गोल्डन ग्लोब नामांकनेही मिळवली आहेत.

3. ज्युनियर NTR

आपण आरआरआर (RRR )बद्दल बोलत असतान ज्यूनियर एनटीआरला ( Jr. NTR ) कसे विसरु शकतो? ज्युनियर NTR ने 'RRR' चित्रपटात राम चरण सोबत काम केले होते.

4. विक्रम

दाक्षिणात्य अभिनेता विक्रमने मणिरत्नमच्या मॅग्नम-ऑपस 'PS - 1' मध्ये अभिनय केला ज्याने सुमारे 500 कोटी रुपये (जगभरात एकूण) कमावले. विक्रम हा तमिळ चित्रपट उद्योगातील सर्वात प्रसिद्ध नावांपैकी एक आहे आणि त्याने गेल्या काही वर्षांत सर्वात जास्त हिट चित्रपट दिले आहेत.

5. कमल हासन

कमल हसनने त्याच्या चाहत्यांना त्याच्या 'विक्रम' या चित्रपटाने आनंद देण्याचे काम केले. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 400 कोटी + चा व्यवसाय केला.

6. रणबीर कपूर

रणबीरने या वर्षी ब्लॉकबस्टर 'ब्रह्मास्त्र: भाग 1 शिवा' द्वारे पुनरागमन केले. या चित्रपटान जगभरात 400 कोटींहून अधिक (एकूण) कमाई केली.

7. कार्तिक आर्यन

भुल भुलैया २ आणि फ्रेडी या दोन मेगा हिट चित्रपट देणाऱ्या कार्तिक आर्यनसाठी २०२२ हे वर्ष उत्तम होते. भूल भुलैया 2 ने जगभरात सुमारे रु 260 कोटी + कमावले तर फ्रेडीने OTT वर असाधारणपणे चांगली कामगिरी केली.

8. अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती

अनुपम खेर यांनी मिथुन चक्रवर्ती सोबत 2022 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक - 'द कश्मीर फाइल्स' मध्ये सह-कलाकार म्हणून काम केले. या चित्रपटाने जगभरात ओळख मिळवली तसेच बॉक्स ऑफिसवर 344 कोटी रुपये कमावले.

9. अजय देवगण

अजय देवगणने 'दृश्यम 2' मध्ये अभिनय केला ज्याने सर्व अपेक्षा ओलांडल्या आणि आतापर्यंत जगभरात 298 कोटींचा गल्ला पार केला आहे. चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे.

10. ऋषभ शेट्टी

ऋषभ शेट्टीने स्वत: दिग्दर्शित 'कंतारा' मध्ये अभिनय केला. ज्याने बॉक्स ऑफिसवर केवळ अपवादात्मक कामगिरीच केली नाही तर समीक्षकांची बरीच प्रशंसाही मिळवली. हा चित्रपट सुमारे 15 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला गेला आणि जगभरात 390+ कोटी रुपये कमावले आहेत.

हेही वाचा -Look Back 2022 : या वर्षात सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रोल झालेले सेलिब्रिटी

Last Updated : Jan 1, 2023, 7:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details