महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Lappu Sa Sachin Song : सीमा-सचिनच्या प्रेमकथेवर तयार केले गाणे झाले व्हायरल... - गाणे झाले व्हायरल

यशराज मुखाटेने 'लप्पू सा सचिन' हे गाणे कंपोज केले. सोशल मीडियावर सध्या हे गाणे खूप व्हायरल होते आहे. या गाण्याला अनेकजण पाहून हसत आहे. याशिवाय या गाण्यावर खूप कमेंट येत आहेत.

Lappu Sa Sachin Song
लप्पू सा सचिन गाणे

By

Published : Aug 6, 2023, 3:20 PM IST

मुंबई :पबजी खेळताना प्रेमात पडलेल्या भारताचा सचिन आणि पाकिस्तानची सीमा हैदर यांच्या प्रेमकथेची दोन्ही देशांमध्ये जोरदार चर्चा आहे. मात्र, जेव्हापासून सचिनच्या शेजाऱ्याने दोघांच्या लव्हस्टोरीबद्दलचे मत मीडियासमोर ठेवले आहे, तेव्हापासून या दोघांबद्दल गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'रसोदे में कौन था'चे निर्माते यशराज मुखाटेने एक व्हिडिओ सध्या बनवला आहे. सचिन-सीमाच्या प्रेमकथेवर बनवलेल्या या व्हिडिओचा लोक खूप आनंद घेत आहेत. हे गाणे ऐकून तुम्हीही खूप हसाल. आता जेव्हाही तुम्ही इस्टाग्राम स्क्रोल कराल तेव्हा हे एक गाणे ट्रेन्ड करत आहे, 'लप्पू सा सचिन'. सध्या हे गाणे खूप व्हायरल केले जात आहे.

'लप्पू सा सचिन' हे गाणे इस्टाग्रामवर होत आहे ट्रेन्ड : यशराज मुखाटेने त्याच्या संगीत शैलीत 'लप्पू सा सचिन' व्हिडिओ ट्यून तयार केली आहे. या व्हिडिओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. यशराजने कोकिला बेनच्या 'रसोदे में कौन था'ला आपल्या संगीताने मसालेदार केले होते. त्याचबरोबर त्याने आता सोशल मीडियावर सचिनबद्दल बोलणाऱ्या महिलेच्या व्हिडिओ आणि आवाजला इडिट करून हे गाणे तयार केले आहे. सचिनबद्दल बोलणाऱ्या या महिलेचे डायलॉग संगीतमय करून यशराज सध्या लोकांची मने जिंकत आहेत. यशराज मुखाटेने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केल्यावर तासाभरातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सचिनच्या शेजाऱ्याचा नवीन व्हिडिओ झाला व्हायरल :नुकताच सचिनच्या शेजारी राहणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये ती मीडियाशी बोलताना तिचे मत मांडताना दिसत आहे. या महिलेच्या व्हिडिओवर देखील अनेकजण हसत आहे. या व्हिडीओमध्ये महिला म्हणते, 'प्रेमामागे काहीतरी कारण असावे. ही एक सामान्य गोष्ट आहे, पण लप्पू आणि किड्यासारखा मुलगा आहे. काय आहे त्या सचिनमध्ये, ती प्रेम त्याच्यावर करायला लागली. त्याला बोलता येत नाही. ना त्याला काही सांगता येत नाही, असे कसे प्रेम आहे. असे या महिलेने व्हिडिओत म्हटले आहे. याशिवाय या गाण्यात त्या महिलेची झलक देखील दाखविण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details