हैदराबाद - दिग्दर्शक हरीश नारायण आणि हरी शंकर यांचा बहुप्रतिक्षित पॅन इंडिया चित्रपट pan India movie Yashoda यशोदाचा सर्व भाषांमधील चित्रपटाचा हार्ड हिटिंग टीझर निर्मात्यांनी प्रदर्शित केला आहे. सामंथा रुथ प्रभूच्या Samantha Ruth Prabhu युनिटने शुक्रवारी हा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
आकर्षक टीझरची Yashoda attractive teaser सुरुवात यशोदाची भूमिका करणाऱ्या सामंथाने Samantha होते, तिला कळते की ती गरोदर आहे. डॉक्टर तिला अनेक सूचना देतात. ती तिला म्हणते: "पहिल्या तीन महिन्यांत, तुला खूप काळजी घ्यावी लागेल. तुला वेळेवर जेवायला हवे आणि शांतपणे झोपावे लागेल. तुला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागेल. तू वजन उचलू शकत नाहीस. तू काहीही करत असताना दुखापत होऊ नये याची काळजी घे. टेन्शन घ्याचे नाही किंवा घाबरायचेही नाही. आनंदी राहा आणि नेहमी हसत रहा."
डॉक्टर सूचना देत असताना सूचनेच्या अगदी विरुध्द घटना तिच्याबाबतीत घडताना पुढील क्लिपमध्ये पाहायला मिळतात. उत्कंठावर्धक अशा या टीझरमध्ये यशोदाचा कशा प्रकारे जीव धोक्यात आहे आणि तिला जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागणार आहे याची कल्पना येते.