महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनुष्का शर्मा-अथिया शेट्टी नरेंद्र मोदी स्टेडियमवर; फोटो व्हायरल - world cup 2023

world cup 2023 : क्रिकेट वर्ल्ड कप 2023चा अंतिम सामना अहमदाबादला नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाल्यानंतर अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. काही फोटोमध्ये विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा, केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी आणि रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह दिसत आहेत.

world cup 2023
वर्ल्ड कप 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 4:53 PM IST

Updated : Nov 19, 2023, 5:35 PM IST

मुंबई - world cup 2023 : क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. हा सामाना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटीही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पोहोचले आहेत. दरम्यान क्रिकेटर पतींच्या पत्नीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी स्टेडियममध्ये चिअर करताना सध्या दिसत आहेत. अलीकडेच, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीचे फोटो स्टेडियममधून समोर आले आहेत. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आपल्या पतीला चिअर करताना स्टेडियममध्ये दिसली. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अनुष्कानं पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे. याशिवाय तिनं यावर पांढऱ्या रंगाचा सनग्लास लावला आहे. यावर तिनं केस मोकळी सोडली असून लाईट मेकअप केला आहे. या लूकमध्ये ती खूप खास दिसत आहे.

अथिया शेट्टी आणि रितिका सजदेहही स्टेडियममध्ये हजर :केएल राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीही अनुष्का शर्मासोबत स्टेडियममध्ये दिसत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अथियानं पांढर्‍या टी-शर्टसह लांब गुलाबी रंगाचे शर्ट घातले आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही त्याच्यासोबत आहे. रितिकानं पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घालला आहे. यामध्ये ती खूप क्यूट दिसत आहे. या तिघींचे फोटो सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याआधी अनुष्का शर्मा सेमीफायनल मॅचमध्येही विराटला सपोर्ट करण्यासाठी आली होती. या सामान्यामध्ये विराटनं 50 वे शतक झळकावून इतिहास रचला होता. यासोबतच त्यानं सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला होता. या सामान्या दरम्यान विराटनं दोन्ही हात वर करून सचिनला आदरांजली दिली होती.

वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटी उत्सुक :उर्वशी रौतेला, 'पुलकित सम्राट,अनिल कपूर, अनूपम खेर , नुसरत भरुचा, सोनू सूद आणि रवीना टंडन अशा अनेक सेलेब्रिटीनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आज सुट्टी असल्यानं अनेकजण क्रिकेटचा आनंद घेत आहेत. याशिवाय सध्या सोशल मीडियावर अनेकजण भारतीय संघ जिंकण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा :

  1. बेस्ट फ्रेंडच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्राचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ व्हायरल
  2. उर्वशी रौतेला ते रविना टंडन, वर्ल्ड कपसाठी ''या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिल्या भारतीय संघाला शुभेच्छा
  3. मल्याळम अभिनेता विनोद थॉमसचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह
Last Updated : Nov 19, 2023, 5:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details