मुंबईAmitabh Bacchan News :विश्वचषकमधील अंतिम सामना होण्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट करत जेव्हा मी सामना पाहत नाही, तेव्हा भारतीय संघ जिंकतो, असं म्हटलं होतं. त्यानंतर चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना ऑस्ट्रेलिया-भारत अंतिम सामना पाहू नका, असा सल्ला दिला होता. या चर्चेनंतर अहमदाबादमधील सामन्यात निमंत्रितांच्या यादीत नाव असूनही अमिताभ हे नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहिले नाहीत. तरीहीभारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी 'बिग बी' यांना ट्रोल केलं.
अंतिम सामन्यासाठी बिग बींनी दिल्या होत्या शुभेच्छा-अमिताभ बच्चन हे सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या मालिकेचं सूत्रसंचालन करतात. भारतीय संघ अंतिम सामना खेळत असताना अमिताभ बच्चन यांनी संघासाठी एक संदेश दिला. त्यांनी रविवारी संदेशात म्हटलं की, भारतीय संघाला १४० कोटी भारतीयांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन आहे. प्रिय रोहित आणि टीम इंडिया, आजच्या दिवसासाठी तुमच्या टीमची वाट काही वर्षांपासून वाट पाहत आहे. त्यासाठी तुम्ही कष्टही केले आहेत. तुमच्यासह संपूर्ण देशानं आजच्या दिवसाची वाट पाहिली. हा संदेशाचा व्हिडिओ केबीसीच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. मैदानातील ११ क्रिकेटपटूबरोबर संपूर्ण देशदेखील श्वास घेणार आहे. तुमच्याबरोबर सर्व देशाचा उत्साह ओसंडून वाहणार आहे. जेव्हा तुम्ही विजयी होऊन हातात विश्वचषक घेताल, तेव्हा १४० कोटी भारतीयांकडून विजयी विश्व तिरंगा प्यारा, असा जयजयकार होईल. ऑल दे बेस्ट टीम इंडिया.