मुंबई - Dunki vs Salaar :चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार शाहरुख खान आणि प्रभास यांच्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. प्रभासचा 'सालार' आणि शाहरुख खानचा 'डंकी' 22 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान शाहरुख आणि प्रभासचे चाहते या तारखेची वाट खूप आतुरतेनं पाहत आहेत. या दोन्ही स्टार्सच्या चाहत्यांमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. 2 नोव्हेंबरला शाहरुखनं वाढदिवसानिमित्त त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'डंकी'चा टीझर रिलीज केला आहे. सोशल मीडियावर शाहरुख आणि प्रभासच्या चाहत्यांमध्ये वॉर पाहायला मिळत आहेत. शाहरुख खानचा हा चित्रपट 'सालार'समोर कुठेही टिकणार नसल्याचं प्रभासचे चाहते सांगत आहेत. यावर आता किंग खानचे चाहते चिडले आहेत.
'डंकी' आणि 'सालार'मध्ये टक्कर :शाहरुख खानच्या चाहत्यानं एक्सवर 'डंकी'च्या टीझरमधील एक क्लिप शेअर करत लिहलं, 'हा सीन 'सालार'साठी पुरेसा आहे'. त्यानंतर एक्स यूजरनं लिहलं 'डंकी'चा टीझर पाहिला, मी गंभीरपणे विचार करत आहात की 'डंकी' प्रभासच्या 'सालार'समोर उभा राहू शकेल? मी पूर्ण विश्वासानं सांगू शकतो की प्रभास बॉक्स ऑफिसवर राज्य करणार आहे'. त्यानंतर शाहरुख खानचा एक चाहत्यानं लिहलं, 'मी निश्चितपणे म्हणू शकतो की 'डंकी' हा सिनेमाचा उत्कृष्ट ठरेल, आम्हाला या चित्रपटाचा टीझर हा खूप आवडला आहे' याशिवाय दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं 'डंकी' चित्रपटाला 10 पैकी 10 दिले पाहिजे. 2023 हे किंग खानचं आहे' अशा अनेक कमेंट सध्या प्रभास आणि शाहरुखचे चाहते करत आहेत.