मुंबई - Who's Your Gynac? trailer Out : अभिनेत्री सबा आझादनं रविवारी एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. ज्यात तिनं लिहिलं होतं 'हू इज युअर गायनॅक?' त्यानंतर सोशल मीडियावर अनेकजणांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला प्रश्न केले होते. याशिवाय काही यूजरनं तिच्या नवीन वेब सीरिजबद्दल कमेंटमध्ये देखील सांगितलं आहे. सबा आझादनं अलीकडेच तिच्या आगामी वेब सीरिजबद्दल तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. तिच्या आगामी प्रोजेक्टचं नाव 'हू इज युअर गायनॅक?' असं आहे. सोशल मीडियावर या वेब सीरिजबद्दल सांगत तिनं लिहिलं, 'अलीकडे माझ्या मनात एकच प्रश्न आला 'हू इज युअर गायनॅक?' असं तिनं शेअर करत यावर एक इमोजी पोस्ट केला आहे.
ट्रेलर झाला प्रदर्शित : सबा आझाद स्टारर 'हू इज युअर गायनॅक?'चा सध्या ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर शेअर करत तिनं इंस्टाग्रामवर लिहिलं, अब्बा शेवटी तुम्हाला 'हू इज युअर गायनॅक?'चे उत्तर कळेल?' तिच्या या पोस्टवर अनेकजण आता प्रतिक्रिया देत आहेत. या वेब सीरिजचा ट्रेलर हा चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत. एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, 'तुझे काम खूप चांगले आहे'. तर दुसऱ्या एकानं लिहिलं, ही वेब सीरिज जबरदस्त असणार आहे. अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत.