महाराष्ट्र

maharashtra

आर्यन खानसोबत व्हायरल फोटोत दिसलेली ही कोण आहे सादिया खान?

By

Published : Jan 7, 2023, 3:09 PM IST

Updated : Jan 9, 2023, 2:21 PM IST

आर्यन खानची ही पाकिस्तानी गर्लफ्रेंड कोण आहे? शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता या 'पाकिस्तानी गर्लफ्रेंड' सादिया खानमुळे चर्चेत आला आहे. या व्हायरल फोटोने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.

आर्यन खान आणि सादिया खान व्हायरल फोटो
आर्यन खान आणि सादिया खान व्हायरल फोटो

मुंबई- बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा-मुलगी (आर्यन खान-सुहाना खान) सध्या खूप चर्चेत आहे. दोन्ही स्टार किड्स त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चेत असतात. अलीकडेच सुहान खान अमिताभ बच्चन यांचा नातू आणि नवोदित अभिनेता अगस्त्य नंदा याला डेट केल्यामुळे चर्चेत आली होती. यापूर्वी आर्यन खान बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर नोरा फतेहीसोबत चर्चेत होता. आता आर्यन खानचे नाव आणखी एका अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे, जी शेजारच्या पाकिस्तानची आहे. आर्यन खानची ही 'पाकिस्तानी गर्लफ्रेंड' कोण आहे यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सादिया खान

आर्यन खान आणि सादिया खानच्या फोटोने खळबळ उडवून दिली - वास्तविक, आर्यन खानचा पाकिस्तानी अभिनेत्री हलिमा सादिया खानसोबतचा एक जवळचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर्यन आणि सादियाची केमिस्ट्री याफोटोत पाहायला मिळत आहे. या छायाचित्रात आर्यन खानने काळ्या टी-शर्टवर पांढऱ्या रंगाचे जॅकेट घातले आहे आणि सादिया काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र हा फोटो कुठला आहे हे समोर आलेले नाही. आता यूजर्स विचारत आहेत की ही सादिया खान कोण आहे आणि आर्यन खान तिच्यासोबत काय करत आहे.

सादिया खान

आर्यन खानची ही पाकिस्तानी गर्लफ्रेंड कोण आहे? - सादिया खानचे पूर्ण नाव हलिमा सादिया खान आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे फोटो शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर सादिया खानचे 1 मिलियनहून अधिक चाहते फॉलो करतात.

सादिया खान

सादियाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही अभिनेत्री म्हणून केली होती. ती पहिल्यांदा यारियां (2010) या टीव्ही शोमध्ये दिसली होती, परंतु 2011 मध्ये पाकिस्तानी शो 'खुदा और मोहब्बत' (2011) मधून तिला घरोघरी ओळख मिळाली. याशिवाय तिने 'ला', 'खुदा और मोहब्बत 2', 'शायद', 'मरियम परेरा' आणि 'अब्दुल्ला द फायनल विटनेस'मध्ये काम केले आहे. गेल्या 12 वर्षांपासून ती इंडस्ट्रीत आहे. ३५ वर्षीय सादियाने कराची विद्यापीठातून मानसशास्त्र आणि व्यवसाय प्रशासनात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.

आर्यन खान आणि सादिया खान व्हायरल फोटो

Last Updated : Jan 9, 2023, 2:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details