महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

SRK fans blast Mahnoor Baloch : 'शाहरुखला अ‍ॅक्टींग येत नाही', म्हणणाऱ्या पाकिस्तानी अभिनेत्रीवर खवळले किंग खानचे फॅन्स

पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोचने शाहरुख खान चांगला अभिनेता नसल्याचे म्हटल्यानंतर किंग खानचे चाहते खवळले आहेत. ते शाहरुखच्या समर्थनार्थ आपली मते मांडत आहेत.

SRK  fans blast Mahnoor Baloch
पाकिस्तानी अभिनेत्रीवर खवळले किंग खानचे फॅन्स

By

Published : Jul 7, 2023, 3:33 PM IST

मुंबई - पाकिस्तानी अभिनेत्री महरूम बलोचने शाहरुखवर केलेल्या कमेंटनंतर सोशल मीडियावर वादळ निर्माण झाले आहे. एका वाहिनीवर बोलत असताना महरूम बलोच म्हणाली की, 'शाहरुख खानला अ‍ॅक्टींग येत नाही'. तिच्या या विधानानंतर बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचे चाहते त्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. किंग खानच्या चाहत्यांनी पाकिस्तानी अभिनेत्री महरुमवर अशी टीका केली. आता शाहरुख खानच्या अभिनय क्षमतेवर भाष्य करणाऱ्या पाकिस्तानी नटीची क्लिप व्हायरल झाली असून, त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

समा टीव्हीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलने पोस्ट केलेल्या मुलाखतीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. 'संपूर्ण जग शाहरूखला ओळखते. मला माफ करा पण तू कोण आहेस?', असे एका व्यक्तीने प्रतिक्रिया देताना म्हटलंय. दुसऱ्या एकान लिहिलंय की, '३.८ अब्ज लोक शाहरूखच्या वर्चस्वावर विश्वास ठेवतात. तो एया का कारणासाठी किंग खान आहे.' आणखी एक व्यक्ती प्रितिक्रिया देताना पुढे म्हणाली, 'ज्या लोकांना देवाने जगात प्रसिद्धी आणि सन्मान दिला आहे त्यांचा आदर करायला शिका! मर्यादित कार्य आणि अहंकारापेक्षा मोठे प्रतिभा असलेल्या दुःखी कलाकारांनी नम्रता शिकली पाहिजे!'

पाक अभिनेत्री महनूर बलोचला वाटते की शाहरुख खान पारंपारिकदृष्ट्या आकर्षक किंवा सक्षम कलाकार नाही. ती म्हणाली की 'तो एक उत्तम बिझनेसमन आहे. त्याला आपले मार्केटिंग कसे करायचे हे त्याला चांगले ठावूक आहे. हे माझे मत आहे. मला माहिती आहे की त्याचे भरपूर फॅन्स आहेत. त्यांना वाटेल की मी चुकीचे आहे, त्या अर्थान कदाचित मी चुकीचे असेन. तुम्ही मला माझे मत विचारले म्हणून हे बोलले. त्याचे व्यक्तीमत्व खूप चांगले आहे, तो चांगला बिझनेसमन आहे.' यावर मुलाखत घेणाऱ्याने तिला विचारले की, 'पण त्याला अ‍ॅक्टींग येत नाही असे म्हणायचंय का तुला'. यावर बोलताना बलोच म्हणाली की, 'तिथं खूप चांगले अभिनय करणारे आहेत. परंतु त्यांना फार यश आले नाही त्यामुळे तो बिझनेस माईंड असलेला व्यक्ती आहे, त्यामुळे तो करु शकला.'

ABOUT THE AUTHOR

...view details